Maharashtra election controversy, Rahul Gandhi allegations : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप अमेरिकेतील एका चर्चेत केलाय. त्याच्या आरोपामुळे देशात गदारोळ उडाला असून राहुल गांधींच्या राजकीय विरोधकांनी त्यांना घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केलाय. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
राहुल गांधी २ दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात राहुल गांधींनी बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप केल्यानं देशात गोंधळ माजलाय. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभांच्या निवडणूकांमध्ये अचानक मतदार वाढवून ईव्हीएममध्ये फेरफार करत भाजपला विक्रमी जागा मिळाल्याचा आरोप मविआनं केला. यामध्ये राहुल गांधींनी आरोपांची राळ उठवत आघाडी घेत थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज केलं होतं. आता बोस्टनमध्ये राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं ज्यामुळे वादाला सुरुवात झाली ते पाहुया.
महाराष्ट्रात जेवढे मतदार नाहीत तेवढं मतदान झालं.
निवडणूक आयोगानं मागितलेली आकडेवारी दिलीच नाही
वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत 65 लाख मतदान झालं
फक्त 2 तासांत 65 लाख मतदान होणं अशक्य
मतदान करण्यास 3 मिनिट लागतात त्यानुसार रात्री 2 वाजेपर्यंत मतदान झालं पाहिजे होतं जे झालं नाही
निवडणुकीची व्हिडिओग्राफी आम्हाला दिली नाही
आम्ही यापुढे प्रश्न विचारू नये म्हणून कायदा बदलला
राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणूकांवर आक्षेप घेतला होता. या निकालाच्या विरोधात राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. या निवडणूकांविरोधात देशभरात राहुल गांधींनी आरोपांची राळ उठवल्यानंतर आता परदेशात तेही थेट अमेरिकेत जाऊन राहुल गांधींनी निवडणूकांवरुन भाजपवर आरोप केल्यानं आता विरोधकांनी राहुल गांधीविरोधात मोहिम उघडलीये.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत विक्रमी असं बहुमत महायुती आणि भाजपला मिळालं होतं. या निवडणूकांमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अगदी तेव्हा पासूनच ईव्हीएममध्ये गडबड करुन निवडणूकांचे निकाल बदलले गेले. हे सरकार ईव्हीएममुळे आल्याचा आरोप मविआनं केला होता आता तर राहुल गांधींनी थेट अमेरिकेत जाऊन सत्ताधाऱ्यांवर आरोप केल्यानं देशभरात चर्चेल्या गेलेल्या या महाराष्ट्राच्या निवडणूकांची चर्चा ही आत जगभरात होणारेय. त्यामुळे जगभरातील प्रभावशाली नेत्यांमध्ये महत्वाच्या स्थानी असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीच्या समिक्षेच्या चर्चेला सुरुवात करुन राहुल गांधींनी एका दगडात दोन पक्षी मारले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.