राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चाललीय..पिकं करपली..गावे ओस पडलीयंत.दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची 3 पथकं राज्याच्या दौऱ्यावर आली आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर एनडीआरएफच्या निकषांनुसार मदतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यात हे पथक पाहणी केली जाणार आहे ते पाहूया...
केंद्रीय पथकानं छत्रपती संभाजीनगरमधील देमणी गावापासून पाहणीला सुरुवात केली असली तरी शेतकरी मात्र यावर समाधानी नाहीत. सरकार केवळ वेळकाढूपणा करत असून एकरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आहेत.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 80 टक्के पिकं बाधित आहेत. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर 324 तालुक्यांत भूजलपातळी घटली आहे. त्यामुळे अस्मानी संकटाने हतबल झालेल्या बळीराजाच्या हातात प्रत्यक्षात मदत कधी पडणार ? ते पाहणे महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.