हा आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीनं पार बेजार करून टाकलंय. नांदेडमधील या शेतकऱ्यानं राज्य सरकारच्या दुष्काळ आढावा बैठकीत घडलेल्या काजू बदाम प्रकारावरून संताप व्यक्त केलाय. शेतातून 1 किलो सोयाबीन काढून दाखवा तुम्हाला क्विंट
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये खामखुडा तालुक्यात दुष्काळामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातही दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचं विदारक चित्र आहे. कळमनुरी तालुक्यातल्या दत्ताराव घुगे यांनी दुष्काळामुळे सापडलेल्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलीय. तर तुळजापुरात आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन आणि मोर्चे काढले आहेत.
धाराशिवमध्ये सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. हजारो ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला... तर जालन्यातही दुष्काळ जाहीर व्हावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय... पुढील 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.. लातूरमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढावलीये. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांसमोर पाणी, चारा आणि आर्थिक संकट उभे राहिलंय.
राज्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांसमोर भयानक परिस्थिती निर्माण झालीये. अनेक शेतकरी निराशेच्या गर्तेत गेले आहेत. त्यामुळे आणखी बळी जाण्यापूर्वी राज्य सरकारनं तातडीनं दुष्काळावर उपायय़ोजना राबवून शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.