CM Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Drought: दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, शासन निर्णय उद्याच काढणार

CM Devendra Fadnavis On Maharashtra Drought: राज्यातील दुष्काळासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. दुष्काळासंदर्भातील जीआर उद्या काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Priya More
  • महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती

  • दुष्काळाचा जीआर उद्या निघणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

  • राज्यातील शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार

दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला शासन निर्णय उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करत आहेत. यावेळी प्रामुख्याने अनेक ठिकाणी जलसाठे कोरडे पडले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल अशा पद्धतीची घोषणा देखील त्यांनी दौऱ्यादरम्यान केली. यासाठीच येत्या काळात शेतकऱ्यांना कशापद्धतीने दिलासा दिला जाणार तसेच किती मदत केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. पाऊस नसल्यामुळे उन्हाने पीक करपून गेली. अनेक शेतकऱ्यांनी शेतातून नांगर फिरवला, तर काहींनी पीकं जाळून टाकली. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. विरोधकांनी देखील तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील दुष्काळ भागात दौरा सुरू केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दुष्काळ जाहीर करण्याबाबत मोठी अपडेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील गावाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'उद्या कोरडा दुष्काळाचा जीआर काढण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. आपण शेतककऱ्यांना विम्याचे देखील पैसे देणार आहे.'

दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना विशेष करून शेतीसोबत जनावरे आणि पिण्याच्या पाण्यांचा प्रश्न गांभीर्याने दिसून येत आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. फडणवीस सरकारकडून या चारा छावण्या सुरू करण्यात येणार का? आणि शेतकऱ्यांसंदर्भात आणखी काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Motion Sickness: कारमध्ये डोकं दुखतं, मळमळतं? या ३ गोष्टी ठेवा बॅगेत, प्रवासात मिळेल आराम

डोंबिवलीचा प्रसिद्ध ‘रासरंग’ यंदा रद्द; शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Milk Tea Vs Green Tea: दूधाचा चहा की ग्रीन टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

SCROLL FOR NEXT