DOMBIVLI'S SHARDUL SHEKHAR VICHARE SECURES ALL INDIA RANK 1 IN CA INTERMEDIATE EXAM 
महाराष्ट्र

CA Intermediate Exam: डोंबिवलीकर शार्दुल शेखर विचारे सीए इंटरमीडियेट परीक्षेत देशात प्रथम

Shardul Shekhar Vichare Tops CA Intermediate Exam: डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने ICAI च्या CA इंटरमीजिएट परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकमिळवला आहे. त्याच्या या नेत्रदीपक यशामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Bharat Jadhav

  • शार्दुल शेखर विचारे यांनी सीए इंटरमीडियेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला.

  • आयसीएआयच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांमध्ये अव्वल स्थान

  • कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले.

संघर्ष गांगुर्डे, ,साम प्रतिनिधी

डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे डोंबिवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर शार्दुलने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शार्दुलच्या या यशामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. त्याच्या यशाने डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. शार्दुलने मिळावलेल्या यशाविषयी बोलताना त्याच्या आई सीमा विचारे यांना शब्द सुचत नव्हते. त्यांना गगनात न मावणारा आनंद झाला होता. त्याचे यश पाहून काय बोलावे हे सुचत नव्हते.

हा आनंद गहिवरून टाकणारा होता, आम्ही खूप आनंदी आहोत. तो शाळेत असल्यापासून त्याचे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असायचा. शांतपणे तो आपला अभ्यास पूर्ण करतो. त्याने जे काही मेहनत घेतली होती, त्याचं फळ मिळालं आहे. सर्व वडीलधाऱ्या, स्वामीच्या आशीर्वादाने त्याला हे यश मिळालं आहे. आमचा आनंद गगनात मावत नाहीये, असं शार्दुलच्या आई म्हणाल्या.

शार्दुल देशात सर्वप्रथम आलाय, त्याने मोठं यश मिळवलं असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शार्दुलबद्दल आम्हाला अभिमान आहे, त्याने प्रचंड मेहनत घेतल, त्याचे फळ त्याला मिळाले आहे. स्वामी समर्थांच्या कृपने त्याला हे यश मिळालंय, याचा आनंद आहे, शार्दुलचे वडील शेखर विचारे आपल्या मुलाच्या यशाबद्दल बोलताना म्हणाले.

आपल्या यशबद्दल बोलताना शार्दुल विचारे याने आई-वडील, आणि स्वामी समर्थांचे आभार मानलेत. तेच शाळा आणि मित्रांचेही आभार मानलेत. जे के शाह क्लासेस आभार मानताना शार्दुलने आपल्या यशाचं गुपीत सांगितलं. डोंबिवलीत ओमकार इंटरनॅशनल शाळेत त्याने आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ११ आणि १२ वीचं शिक्षण त्याने मांटुगामधील आर ए पोद्दार कॉलेजमधून पूर्ण केली. त्यानंतर सीए फाउंडेशन परीक्षा दिली, त्यात उत्तीर्ण झाला, त्यात त्याचा देशातून तिसरा क्रमांक आला होता

.त्यानंतर सीए इंटरमीडियेटचे क्लासेस त्याने सुरू केले. शार्दुलने अभ्यासाच्या दिनक्रम सांगताना म्हणाला की, दररोज माझे सात तास सीए इंटरमीडियेटचे क्लास असायचे. रात्री आणि सकाळी उठल्यानंतर काही वेळ अभ्यास करायचा. दररोज तो दोन ते चार तास अभ्यास करायचा. क्लास संपल्यानंतर शेड्यूल लीव्हमध्ये त्यांना १२ तास अभ्यासाठी मिळायचे त्यात तो ८ ते १० तास अभ्यास करायचा. अशी प्रचंड मेहनत घेतल्यानंतर आपण हे यश मिळवू शकलो असं शार्दुल विचारे माध्यमांशी बोलताना म्हणाला. आपण टॉप १० मध्ये येऊ असा अंदाज होता, पण देवाच्या कृपेने मी टॉप ३ मध्ये आलो असंही शार्दुल म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT