Ajit Pawar Death News Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला, अजित पवार यांच्या निधनानंतर दिल्लीपासून ते राज्यापर्यंत सर्व दिग्गज नेते झाले भावुक

PM Narendra Modi On Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे लाडके मंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक दिग्ग्ज नेत्यांनी शोक व्यक्त केला.

Alisha Khedekar

  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

  • अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू

  • महाराष्ट्रच्या नेत्यांनी व्यक्त केलं दुःख

  • सोशल मीडियावर पोस्ट करत केलं दुःख व्यक्त

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. या अपघातावेळी त्यांच्यासोबत ५ जण होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र्राला खूप मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेनंतर नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि द्रौपदी मूर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.

विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.

अजित पवार कष्टाळू व्यक्तिमत्व - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, अजित पवार जी हे जनतेचे नेते होते. त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.ओम शांती.दरम्यान अजित पवार यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्राने एक कष्टाळू नेता गमावला आहे. शिवाय बारामतीत देखील हळहळ व्यक्त होत आहे.

द्रौपदी मूर्मू यांनी व्यक्त केलं दुःख

अजित पवार यांच्या निधनानंतर द्रौपदी मूर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी त्यांची नेहमी आठवण ठेवली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि चाहत्यांप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वांच्या कुटुंबीयांनाही हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो.

माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे - अमित शहा

अजित पवार यांच्या निधनानंतर अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, आज झालेल्या एका दुःखद दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीएतील आमचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार जी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. ते जेव्हा केव्हा भेटायचे, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन हे एनडीए कुटुंबासाठीच नव्हे, तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकाच्या या कठीण प्रसंगी संपूर्ण एनडीए पवार कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे. ॐ शांती शांती शांती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : एक कर्ता व्यक्ती गेल्याने सगळी समीकरणे बदलून जातात- सत्यजीत तांबे

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी, दादांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केलं दुःख

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला शोक व्यक्त

Maharashtra Live News Update: देवळाली प्रवरा गावात कडकडीतं बंद!

SCROLL FOR NEXT