Ajit Pawar Plane Crash Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Baramati Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. या अपघाताचे वृत्त कळताच पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएने ही माहिती दिली आहे. या अपघातामध्ये अजित पवार देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामतीमध्ये सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार हे विमानाने आज सकाळी बारामतीला निघाले होते. विमानाचे लँडिंग होत असताना ते कोसळले. बारामती एअरपोर्टजवळ ही घटना घडली. विमान कोसळल्यानंतर त्याचे अनेक तुकडे झाले आणि मोठी आग लागली. या अपघातानंतर घटनास्थळावर पोलिस, अग्निशमन दलाने धाव घेतली. अजित पवार यांच्यासह सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विमान अपघातामध्ये जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट, सुरक्षारक्षक आणि प्रवाशांचा समावेश आहे. तर अजित पवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या अपघातामध्ये बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. बारामतीमधील या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : जालन्यात अपघाताचा थरार, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

Summer Sharbat Recipe : नारळ पाणीला टक्कर; उन्हाळ्यात प्या 'या' फळाचे थंडगार सरबत, वाचा सोपी रेसिपी

Weekly Horoscope: या राशींना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT