Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार, कदापी मागे हटणार नाही - अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंड केल्याने महाराष्ट्रातील राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. शिंदे गटाकडे जवळपास ४० आमदार गुवाहाटीत असल्याचे कळते. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, असं ट्विट करत शिंदेंनी मुख्यंमंत्र्यांना सूचक इशारा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षश्रेष्टींसह सर्व खासदार- आमदारांसोबतची बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही सर्व पाठिंबा देणार, कदापी मागे हटणार नाही, असं पवार यांनी ठामपणे जाहीर केलं आहे.

अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, मविआ सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊ.राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार कसे टिकेल हे प्रयत्न शेवटपर्यंत करत आहे. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे यापेक्षा वेगळी कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नाही.शिवसेनेत काही प्रश्न आमदारांमध्ये निर्माण झालेत, त्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते नेते सांगतील.काही आमदार परत आले आहेत. नितीन देशमुख,पाटील असतील,त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकडे जे आमदार आहेत, त्यांनाही आवाहन केले जात आहे. आजही त्यांच्या पक्षांच्या नेते आवाहन करत आहेत.आमची भूमिका आघाडी सरकार टिकवण्यासंदर्भात आहेत.सर्व आमदार आमच्यासोबत आहेत.

यावेळी पवार पुढे बोलताना म्हणाले, आमची भूमिका आघाडी सरकार टिकवण्यासंदर्भात आहेत. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. काही आमच्यातले मित्रपक्ष वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत.मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे, सरकारने अडीच वर्षांत निधीत कुठेही काटछाट केली नाही. सगळे प्रकारचे निधी दिला गेला आहे. तरीही कशा पद्धतीने वक्तव्ये केली जात आहेत मला माहीत नाही. मी सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका घेत असतो,हे आपण बघताच.

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, तसेच शिवसेनेचे काही प्रमुख नेते हे एकत्रित असताना असं काही सांगितलं असते तर,गैरसमज दूर झाले असते. आघाडी कशी टिकेलआणि आताची परिस्थिती नीटपणे हाताळता येईल, याचे प्रयत्न सुरू आहेत.काही भागांत एखाद्या ठिकाणी आमदार एका पक्षाचा आहे, नगरपालिका दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात आहे,तिथं थोडंसं काही घडलं असेल. तिथे आमदारांना काही त्रास होऊ नये, हा प्रयत्न केला आहे, असं स्पष्टीकरण पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

SCROLL FOR NEXT