अमर घाटगे, साम टीव्ही
अमरावती: येथील 18 वर्षीय तरुणी मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना 5 जणांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेऊन तरुणीसोबत सामूहिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगलात घडली. या प्रकरणी फ्रेजपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 संशयित आरोपीना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्रा दुचाकीवरून जात असताना 5 मुलांनी त्यांना अडवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या मित्राच्या खिशातील 150 रुपये काढले. त्यानंतर एकामागून एकाने अत्याचार केला. यानंतर पीडितेची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडिता आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच जणांनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पीडितेच्या मित्राच्या खिशातील 150 रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला असून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.