Maharashtra Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime News : हत्येनंतर मुंडकं छाटलं; बाप्पाचा प्रसाद घेण्यावरून एकाला संपवलं, वाचा गुन्हेगारीच्या बातम्यांचा आढावा

Maharashtra Crime News Update on 16 september 2024 : गुन्हेगारी विश्वाशी संबंधित बातम्यांचा थोडक्यात आढावा. कायद्याने गुन्हा असलेल्या या कृती माणसांकडून अजाणतेपणाने किंवा जाणून-बूजून होत असते. क्राईम न्यूज या सदरामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात घडलेल्या गुन्हेगारीच्या बातम्यांचा आढावा...

Namdeo Kumbhar

ठाणे हादरलं! हत्येनंतर तरुणाचं मुंडकं छाटलं

ठाण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली, त्याचं मुंडकं छाटून मृतदेहाजवळ ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. घोडबंदर येथे इमारतीच्या टेरेसवर हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी म्हणून सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. या मागणीसाठी तळोदा शहरातील हजारो महिला नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील बिरसा मुंडा चौकात कॅण्डल मार्च काढत नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

73 वर्षीय व्यक्तीचा ९ वर्षीय मुलीवर अत्याचार

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे, खासगी क्लासमध्ये शिकत असणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लास मध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने संबंधित बालिकेवर अत्याचार केला. याप्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी श्रीपती भोसले याला अटक केली आहे.

नाशिकमध्ये रोड रोमियोंना भर रस्त्यात चोप

मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना नाशिकमध्ये भररस्त्यात चोप दिला आहे. निफाड पोलिसांनी रोडरोमिओंच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शाळेच्या गेटवर, शाळेत अथवा घरी पायी रस्त्याने जात असताना काही तरुण आणि अल्पवयीन टवळखोरांकडून विद्यार्थिनींची छेड काढण्यात येत होती. अश्लील इशारे करून या टवाळखोरांकडून मुलींची छेड काढण्यात येत असल्याने या टवाळखोरांना भररस्त्यात चोप दिला. मुलींच्या घरच्यांनी टवाळखोर मुलांना पकडून चांगलाच चोप दिला. भर रस्त्यात चोप दिल्याने टवाळखोरांचे धाबे दणाणले, चोप देत या लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

दोन कोटी रुपयांची खंडणी -

छत्रपती संभाजीनगरात एका कापड व्यावसायिकाला अज्ञात क्रमांकावरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने वेगवेगळ्या ५ मोबाइल क्रमांकांवरून फोन करीत कुटुंबातील मुलांना मारण्याची धमकी देत खंडणी मागितली. सचिन सतीश कृपलानी असे कापड व्यावसायिकाचे नाव असून त्रिमूर्ति चौकात त्यांचे कापडाचे दुकान आहे.

१३ सप्टेंबर रोजी कृपलानी यांचे भाऊ रितेश यांना फोन आला. परंतु, तो त्यांनी उचलला नाही.दुसरा फोन दुपारी १ वाजून ४१ मिनिटांनी सचिन कृपलानी यांना आला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणकोणत्या वेळी कोठे जातात हे धमकी देणाऱ्याने सांगितले. त्यानंतर 'मैं तुम्हें एक घंटे का टाइम देता हूं, भाईयों से बात करके मुझे बता दो करोड रुपये कब और कैसे देगा. नहीं तो २४ घंटे के अंदर तुम्हारें तीनों भाईयों के तीन बेटे और तीन बेटीयों में से किसी एक का मर्डर करके वापस कॉल करूंगा,' अशी धमकी आरोपीने दिली.या प्रकरणी सचिन कृपलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दररोज सायंकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून प्रत्येक चौकात तपासणी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी ३३५ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. त्यात २१ वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे समोर आले. वाहन चालकांनी दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली -

आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक बंदूक आणि तब्बल १७५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. शनिवारी पुण्यातील उरूळी कांचनमधील इनामदारवस्ती या ठिकाणी एका जणाने त्याच्या बंदुकीतून दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आलं आहे. दशरथ शितोळे यासह तीन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. या गोळीबारात काळूराम महादेव गोते हे जखमी झाले आहेत. अर्थिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शितोळे यांच्याकडे दोघेजण आले होते. पैशांच्या कारणातून त्यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान शितोळे यांनी त्यांच्या पिस्तूलातून दोघांवर गोळीबार केला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता.

रेल्वेचा घातपात करणाऱ्या दोघांना सत्तावीस वर्षांनंतर अटक -

पुणे - दौंड - सोलापूर लोहमार्गावर सत्तावीस वर्षांपूर्वी घातपात करून प्रवासी गाडी रोखल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन संशयितांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नई एक्सप्रेसमध्ये लूटमार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घातपात केला होता. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना या बाबत माहिती दिली. पिंट्या उच्चानाना काळे ( वय ४५ , रा. राक्षसवाडी, ता. कर्जत जि. नगर) व सुभाष बनात पवार ( वय ५५ , रा. लोणी देवकर, ता. इंदापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

अहमदपूरमध्ये दरोडा, 62 वर्षीय वृद्धाचा खून

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील रूद्धा शिवारात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत चोरी केली आहे. रावसाहेब केंद्रे वय 62 वर्षे हे आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत शेतामध्ये राहत होते. मध्यरात्री तीन चोरट्यांनी केंद्रे यांच्या घरावरती दरोडा टाकत घरातील रोख रक्कम, आणि सोन्याचे दागिने असा एकूण 53 हजाराचा मुद्देमाल चोरी केला आहे. मात्र दुर्दैवी घटना म्हणजे रावसाहेब केंद्रे व त्यांच्या पत्नी या दोघांना जबर मारहाण झाली यात पत्नी बेशुद्ध झाली. मात्र पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी पोलीस अधिकारी आणि श्वान पथकाने केली आहे .

निर्बंधाला कंटाळून मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी

बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडलीय. प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आलेय. प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून मागील 2 वर्षांपासून पती सोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाइल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. विवेक ने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची हत्या केली.

बाप्पाचा प्रसाद घेण्याच्या कारणातून एकाचा खून

यवतमाळमध्ये बाप्पाचा प्रसाद घेण्याच्या कारणातून एकाची हत्य केल्याची धक्कादायक घटना घडली. २३ वर्षीय बादल टाले ह्यांच्या डोक्यवर विटाने मारून खून केलाय. यवतमाळच्या आर्णी शहरातील संभाजीनगरात घटना घडली आहे.

मृतकला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असतात डॉक्टरांनी मृत घोषित केलेय. पोलिसांनी एका आरोपीला अटक केले. या घटनेने गणेशोत्सवाला गालबोट लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT