महाराष्ट्र

कागदपत्र संभाळण्याचं झंझट संपणार; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डबाबत सरकारचा मोठा निर्णय

Educational Documents: अपार (APAAR) आयडी हा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणारा स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक आहे. तो केंद्र सरकारच्या 'एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र' या संकल्पनेशी संबंधित आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी 67 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

  • शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंतचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध

  • महाराष्ट्रातील 2 कोटी 67 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार

  • अपार आयडी निर्मितीच्या कामगिरीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या जतन आणि वापराची पारंपरिक पद्धत आता बदलणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे जपून ठेवावी लागत. बऱ्याचदा कागदपत्रे हरवणे, खराब होणे किंवा पुन्हा मिळविण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अपार आयडीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

अपार आयडी उपक्रामाद्वारे शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंतचे शैक्षणिक रेकॉर्ड एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील तब्बल २ कोटी ६७ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आलेत. या कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र या संकल्पनेवर आधारित अपार आयडी प्रणालीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र डिजिटल ओळख मिळेल.

या ओळखीशी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची माहिती जोडली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंतचे शैक्षणिक रेकॉर्ड एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यात विद्यार्थ्यांचे श्रेयांक, पदवी, पदविका तसेच विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजीलॉकर आणि अपार आयडीशी जोडून उपलब्ध करून दिली जातील.

निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांच्या खात्यावर उपलब्ध होतील. यामुळे विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज कमी होईल. डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे सर्व्हरवर सुरक्षित उपलब्ध राहणार असल्याने ती दीर्घकाळ जतन करता येतील. विद्यार्थ्यांना कोणत्याही भागातून आवश्यकतेनुसार आपली शैक्षणिक माहिती मिळविता येईल.

या गोष्टीमुळे उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे, सरकारी विभाग तसेच खासगी कंपन्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी करणे सोपे होणार आहे. बनावट प्रमाणपत्रांना आळा बसण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : तब्बेत सांभाळा! 6 राशींचे नशीब चमकणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: माओवादी असल्याचा बनाव करणाऱ्या सहा जणांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Earthquake: नाशिक- पालघर पुन्हा हादरलं! सुरगाणा,दिंडोरी, कळवण भागातील जमीन थरथरली, वारंवार का येतोय भूकंप?

Palghar Waterfall : पालघरपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' मनमोहक धबधबा, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट!

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT