Maharashtra Corona Update: चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,914 नवे रुग्ण Saam TV
महाराष्ट्र

Corona Update: चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,914 नवे रुग्ण

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 33914 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 86 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्रात काल कोविड-19 चे 33,914 नवीन रुग्ण (Patient)आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 75,69,425 झाली आहे, तर 86 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,42,237 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department) ही माहिती दिली आहे. संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) स्वरूपाच्या 13 प्रकरणांचाही समावेश आहे. याआधी सोमवारी राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 28,286 नवीन रुग्ण आढळून आले होते, तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron च्या 2,858 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,534 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात कोविड (Covid)-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,02,923 झाली आहे. या दरम्यान राजधानी मुंबईत संसर्गाची 1,815 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 30,500 रुग्ण बरे झाले असून, त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 71,20,436 झाली आहे. संसर्गातून बरे होण्याचा दर 94.07 टक्के आहे.

ओमिक्रॉन, महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात ओमिक्रॉनचे 13 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून नोंदवले गेले आहेत. नवीन रुग्णांपैकी 12 रुग्ण पुणे शहरात, तर 1 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 7,36,84,359 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 1,72,498 नमुन्यांची गेल्या 24 तासांत चाचणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT