Bharat Jodo Yatra Srinagar Saamtv
महाराष्ट्र

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेच्या ऐतिहासिक समारोपाकडे कॉंग्रेस नेत्यांचीच दांडी; शिवसेना, राष्ट्रवादीनेही फिरवली पाठ

कॉंग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे प्रमुख नेते या सभेला अनुपस्थित होते, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही या सभेकडे पाठ फिरवली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, साम टिव्ही

Bharat Jodo Yatra: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारीहून निघालेल्या 'भारत जोडो यात्रे'चा आज शेवटचा दिवस होता. आज काश्मिरमधील श्रीनगरात ही यात्रा समाप्त झाली. यावेळी राहुल गांधींची जाहीर सभाही घेण्यात झाली. ज्यामध्ये त्यांनी या यात्रेबद्दलचा अनुभव सांगितला. मात्र महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीने मात्र या ऐतिहासिक समारोप सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. (Bharat Jodo Yatra)

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गांधींच्या ऐतिहासिक समारोपाच्या भाषणाकडे महाराष्ट्रातील प्रमुख कॉंग्रेस (Congress) नेत्यांनी तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही पाठ फिरवल्याचे दिसून आले. कॉंग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे प्रमुख नेते या सभेला अनुपस्थित होते, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही या सभेकडे पाठ फिरवली.

कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे ही नेते मंडळी उपस्थित होती.

महत्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) श्रीनगरमध्ये असूनही या कार्यक्रमाला गैरहजर होते. तर विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आजारी असल्याने कार्यक्रमाला गेले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील निमंत्रण मिळूनही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या अनुपस्थितीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: ...तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचं ओपन चॅलेंज

Diwali Bonus : दिवाळीच्या एक दिवस आधीच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, ६० दिवसांचा बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : धुळ्याच्या साक्रीत काँग्रेसला खिंडार

Narak Chaturdashi Marathi Wishes: दिवाळी पहाट...नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना आणि मित्रमंडळींना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Navi Mumbai Tourism: फिरण्यासाठी हिल स्टेशन शोधताय? नवी मुंबईपासून ५८ किमीवर वसलंय असं एक ठिकाण, पाहून भुरळ पडेल

SCROLL FOR NEXT