Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

पावासाळी अधिवेशनात प्रश्नांची सरबत्ती, CM एकनाथ शिंदें भाषणात काय म्हणाले? वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) तिसऱ्या दिवसाचे कामकाज आज रात्री साडेनऊच्या दरम्यान संपले. या अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांनी राज्यातील विविध समस्यांच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारची पुन्हा एकदा कोंडी केली. अधिवेशनादरम्यान विधानसभेत नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) विभागाच्या पूरक मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे खालीलप्रमाणे

● हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा,गोंदिया,आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे.गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

● रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे.

● पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत.

● रांजनोली-मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडीमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

● आरे वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.

● मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे.ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड -टिटवाळा पर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल.

● एमएमआरडीएच्या माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

● मुंबई महानगरात एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे.अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने,अथवा उदवाहने बसविण्याचा विचार आहे.

● काही नगरपालिकांची आर्थिक परि स्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल.

● कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

● स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

● खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पामध्ये तांत्रिक बाबींची तपासणी करून नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबल डेकरचा समावेश करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल.

● गोंदिया शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत, त्याला मंजुरी देखील मिळाली आहे, त्यात १५५५ लाभार्थी संख्या आहे. कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात येतील.

● वसई-विरार महानगरपलिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह उघड्या गटारींवरील झाकणे बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. तुटलेल्या लोखंडी, सिमेंट झाकणांची मागणी नोंदविण्यात आली असून आतापर्यंत ५ हजारपेक्षा अधिक झाकणे बसविण्यात आली आहेत, उर्वरित बसविण्याच्या सूचना देण्यात येतील.

● संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील.

● पुरवणी मागणीद्वारे सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

● हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल.

● नगरविकास विभागाच्या सन २०२२-२३ वर्षाच्या सुमारे १८८६ कोटी ४१ लाख रुपयांच्या मागण्या यावेळी विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

● सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या सुमारे २४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT