Chhagan Bhujbal oath Saam TV News in Marathi
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांचे नाव घेत म्हणाले….

Chhagan Bhujbal oath : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंगळवारी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडेंकडील खाते त्यांच्याकडे सोपवले जाणार असून हा शपथविधी राजभवनात सकाळी १० वाजता होणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra cabinet reshuffle : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज राजभवनात मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्याशिवाय मंत्रिपदबाबत आठ दिवस आधीच समजल्याचेही त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अमित शाह यांचे आभार मानले. मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal to Take Oath as Minister) धनंजय मुंडे यांचे रिक्त झालेले खाते देण्यात येणार आहे. आज ते कार्यभार स्वीकारतील.

महायुतीचे सरकार आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्यात आले होते. मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. अनेकदा मीडियासमोर बोलताना भुजबळ यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती. त्याशिवाय मंत्रि‍पदाच्या शपथविधी सोहळ्यालाही त्यावेळी ते अनुपस्थित होते. पण धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावे लागले अन् छगन भुजबळ यांना लॉटरी लागली. मंत्रीपदची शपध घेण्याआधी छगन भुजबळ यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. ज्याचा शेवट चांगला, त्याचं सगळं चांगलं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्रि‍पदाबाबत आठ दिवसापूर्वी ठरलं होतं. आमची मिटिंग झाली होती, त्यामध्ये मंत्रि‍पदावर शिक्कामोर्तब झालं होतं, असे भुजभळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार मानतो. समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्याचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्वांचे आभार मानतो, असेही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांना कोणतं खातं मिळणार ?

महाराष्ट्राचे राज्यपाल आज छगन भुजबळ यांना मंत्रि‍पदाची शपथ देणार आहेत. त्यानंतर ते खात्याचा पदभार स्वीकारतील. पण भुजबळ यांच्याकडे कोणतं खातं येणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी भुजबळ यांना मिळेल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT