dhananjay munde twitter
महाराष्ट्र

Mahayuti Cabinet Expansion: गोपीनाथ मुंडे यांचा वारसा, राजकारणात चढउतार, धनंजय मुंडेंचा धगधगता राजकीय प्रवास

Dhananjay Munde Oath Ceremony: बीडचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Ankush Dhavre

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची हवा पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत महायुतीने वनसाईड विजय मिळवत सरकार स्थापन केलं. या निवडणुकीत परळी विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनजंय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होते.

तर त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख मैदानात उतरले होते. या लढतीत धनंजय मुंडेंनी बाजी मारत राजेसाहेब देशमुख यांचा तब्बल १ लाख ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान कसा राहिलाय त्यांचा एकूण राजकीय प्रवास? जाणून घ्या.

धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायर ब्रँड आणि प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाषणांना तुफान गर्दी होत असते. विधानसभा निवडणुकीत ते परळी मतदारसंघातून उभे होते.

या मतदारसंघातून ते राज्यातून सर्वाधिक दुसऱ्या नंबरच्या म्हणजे एक लाख ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

हा त्यांचा परळीतील सलग दुसरा विजय ठरला. यासह परळीकरांनी त्यांच्यावर मतांचा पाऊस पाडला. राज्यात सर्वाधिक मत मिळवण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला.

महायुतीला आणि आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिंकून देण्यासाठी पूर्ण जोर लावला. त्यांनी विधानसभा निवडणुकीत २४ पेक्षा अधिक मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. या आधी महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार असताना त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं.

धनजंय मुंडे यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत विधान परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं. या दरम्यान त्यांनी चमकदार कामगिरी केली होती.पक्षातील तरुण, आक्रमक, अभ्यासू, ओबीसी आणि मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात.

पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अतिशय निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार विजय झाले असून त्यात धनंजय मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT