sanjay rathod twitter
महाराष्ट्र

Sanjay Rathod: पाचव्यांदा आमदार, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ! वाचा संजय राठोड यांचा राजकीय प्रवास

Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपुरात पार पडला. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Ankush Dhavre

महायुतीच्या विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपुरात पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात २५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत दिग्रस मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झालेले शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

संजय दुलीचंद राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा २८,७७५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत त्यांना १४३, ११५ मतं मिळाली होती. संजय राठोड हे पाचव्यांदा निवडून आले आहेत.

ही २०२४ विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही त्यांची पाचवी टर्म असणार आहे. यापूर्वी त्यांनी २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये निवडुन आले आहेत.

संजय राठोड यांनी १९९३ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यास सुरुवात केली. शाखा प्रमुख म्हणून राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर सलग १८ वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून कार्य केले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून २००४ मध्ये दारव्हा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. २००९ मध्ये दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे पुनर्गठन झाले. त्यात हा मतदारसंघ दिग्रस असा झाला. त्यानंतर संजय राठोड हे २००९ ते २०२४ अश्या चार टर्म सातत्याने दिग्रस येथून विजयी झाले. या निवडणुकात त्यांनी संजय देशमुख, वसंत घुइखेडकर आदी नेत्यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी दिग्रसमधून काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा २८ हजार ७७५ मतांनी पराभव केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

SCROLL FOR NEXT