Eknath shinde and Devendra Fadnavis
Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरले; पाहिल्या टप्प्यात BJP - शिंदे गटाला किती मंत्रिपदे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची ? असा सवाल सुप्रीम कोर्टात उपस्थित झाल्याने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) लांबणीवर पडल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका-टीपण्णी केली जात आहे. पंरतु, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. येत्या ५ ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात १२ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपच्या ७ तर शिंदे गटातील ५ मंत्र्यांचा शपशविधी होणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जूनच्या अखेरीस राजभवनात पार पडला. त्यानंतर महिना उलटला तरीही राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. परंतु,५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार सायंकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम लागला आहे. राजभवनमध्ये नव्या मंत्र्यांचा शपशविधी होणार असल्याचंही समजते.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मंत्र्यांच्या नावाची यादी मंजूर झाली आहे.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा गाडा हाकत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचं सदस्यत्व अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. एकनाथ शिंदे गटानेही शिवसेनेच्या याचिकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT