BJP Dhule MLA Jaykumar Rawal  
महाराष्ट्र

Jaykumar Rawal Profile : भाजपचे रिटर्न गिफ्ट, जयकुमार रावल यांना मंत्रिपद, वाचा राजकीय प्रवास

BJP Dhule MLA Jaykumar Rawal : धुळ्यात भाजप महायुतीला १०० टक्के यश मिळाले. त्यामध्ये जयकुमार रावल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार जाणार, याकडे धुळेकरांच्या नजरा खिळल्या आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज

Maharashtra Cabinet Expansion : जयकुमार रावल यांना भाजपकडून मंत्रि‍पदाचे रिटर्न गिफ्ट देण्यात आलेय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल यांनी धुळ्यात भाजपला न भुतो न भविष्य असं यश मिळवून दिले. धुळ्यातील पाचही जागेवर महुयातीच्या उमेदवाराचा विजय मिळवला. रावल यांच्या नेतृत्वात धुळ्यावर महायुतीने झेंडा फडकावला होता. आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत भाजपकडून योग्य सन्मान केल्याची प्रतिक्रिया धुळ्यात आहे.

जयकुमार रावल धुळ्यातील शिंदखेडा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार झाले. आज सकाळी त्यांना भाजप कार्यालयातून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला.

खानदेशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दोंडाईचा येथील रावल राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक पदापासून रावल यांची राजकीय सुरुवात झाली. वयाच्या 28 व्या वर्षी तत्कालीन मंत्र्यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापिठात झालेय. बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण जयकुमार रावल यांनी घेतले..

जयकुमार रावल हे 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्रीपदी त्यांची निवड झाली होती. रोहयो, पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला आहे. यावेळी त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार मिळणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागलेय.

- खानदेशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दोंडाईचा रावल संस्थानात (राजघराण्यात) जन्म

- सलग पाचव्यांदा भाजपा कडून आमदार

- दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवकपदापासून राजकीय सुरुवात..

- वयाच्या 28 व्या वर्षी तत्कालीन मंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश...

- इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापिठात बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण..

- 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी..

- 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबीनेटमंत्रीपदी निवड..

- रोहयो, पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार सांभळला..

- नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणूकीत 96 हजार मताधिक्याने विजय..

- धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे सर्व 5 आमदार विजयी. आ. रावल यांचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT