Chandrakant Patil 
महाराष्ट्र

Chandrakant Patil Profile : मिल कामगाराचा मुलगा, अभविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री, वाचा चंद्रकांत पाटलांची राजकीय कारकीर्द

Kothrud Amdar Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे कोणत्या खात्याच्या जबाबदारी मिळणार? याकडे तमाम पुणेकरांच्या नजरा खिळल्या आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Cabinet expansion: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आज नागपूरमध्ये होणार आहे. भाजपकडून आमदारांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फोन जाण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनाही भाजपकडून मंत्रि‍पदासाठी फोन गेला आहे. नागपूरमध्ये ते आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांना कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे तमाम पुणेकरांचे लक्ष लागलेय.

चंद्रकांत पाटील यांचा जन्म मुंबईमध्ये सर्वसामान्य घरात झाला. त्यांचे आई-वडील मिल कामगार होते. चंद्रकांत पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. आज ते कॅबिनेट मंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.

भाजपमधील वरिष्ठ नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. एक लाख मतांनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता. मागील महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी होती. आता फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना कुठली जबाबदरी मिळतेय? याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेय.

२०१९ ते २०२२ मध्ये चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले. २०१४ मधील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सार्वजनिक उपक्रम वगळता कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.आता त्यांच्याकडे कोणते मंत्रिपद मिळतेय, हे काही तासांतच स्पष्ट होईल.

चंद्रकांत पाटील यांचा थोडक्यात परिचय -

जन्म १० जून १९५९; प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई,

आई-वडील दोघेही मिल कामगार,

राजा शिवाजी वि‌द्यालय, दादर, मुंबई येथे शालेय शिक्षण

सिद्धार्थ महावि‌द्यालय, फोर्ट, मुंबई येथे बी. कॉम. पदवी शिक्षण.

पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, बी. कॉम., आयसीडब्ल्यूए (कॉस्ट ऑडिटर)

- एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रो‌द्योग आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी

-ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा पालकमंत्री; ४ ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

१) मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.

२) नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.

वस्त्रोद्योग मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.

राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम?

२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रो‌द्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी.

विधिमंडळ कार्य काय काय ?

जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. ऑगस्ट २०२२ पासून संसदीय कार्य मंत्री म्हणून प्रभावी कार्य.

भारतीय जनता पार्टी, प्रदेशाध्यक्ष दि. १६ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत

- प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.  प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रभावी कार्य

संघ परिवारासोबत चांगले संबंध -

अखिल भारतीय वि‌द्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता. महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर काम केले. १९८० ते १९९४ ऐन तारुण्यात संघटनेसाठी पूर्णवेळ संपूर्ण समर्पणाने काम. त्यानंतर १९९५- १९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून तर सन १९९९-२००४ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात योगदान.

सामाजिक बांधलकी

कोथरूड मध्ये समुत्कर्ष सोशल फाउंडेशन, मानसी उपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नववधूंना झाल, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल मुलींचे पालकत्व, मोफत ई सेवा केंद्र, कोवीड काळातील सेवा कार्य, दिवाळी फराळ, एकांकिका स्पर्धा, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून कोथरुड मधील प्रत्येक घटकाशी संपर्क स्थापन करण्यात यश.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT