बीड : सत्तास्थापनेच्या अडतीस दिवसानंतर आज शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना स्थान मिळाल्याने सकल मराठा समाज आणि छावा संघटनेकडून बीडमध्ये जल्लोष करण्यात आला. तसेच या छावा संघटनेने तानाजी सावंत यांना बीडचे पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)
आज राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात आमदार तानाजी सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळं बीडमध्ये सकल मराठा समाज आणि छावा संघटनेकडून याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी बीड शहरातून मोटार सायकल रॅली काढत, घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. त्याचबरोबर बीड शहरातील शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून ढोलीबाजाच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. त्यामुळे एक महिना लोटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने जनतेचे लक्ष देखील विस्ताराकडे लागले होते. मात्र, सत्तास्थापनेच्या अडतीस दिवसानंतर शिंदे सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात आमदार तानाजी सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे बीडमध्ये सकल मराठा समाज आणि छावा संघटनेकडून जल्लोष करण्यात आला. सावंत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्याची मागणी, यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी केली आहे. छावा संघटनेच्या मागणीनंतर सावंत यांना बीडचे पालकमंत्री मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.