Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

Maharashtra Cabinet : महाराष्ट्रात १५,००० पोलीस भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. रास्त भाव दुकानदारांचा मार्जिन वाढ, हवाई प्रवासासाठी निधी, आणि सामाजिक न्याय विभागाच्या कर्ज योजनेत सवलत, हा निर्णयही घेण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

  • राज्यात १५ हजार पोलीस भरतीस कॅबिनेट मंजुरी.

  • दोन महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता.

  • रास्त भाव दुकानदारांचा मार्जिन वाढवण्याचा निर्णय.

  • सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी मंजूर.

Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणांना सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात तब्बल १५ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची आता प्रतिक्षा आता संपली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये पोलीस दलात भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. दोन महिन्यात राज्यात पोलीस भरती होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंची दांडी, नाराज असल्याच्या चर्चा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. एकनाथ शिंदे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दौरा आटोपल्यानंतरही शिंदे राज्यात परतणार होते, पण ते तिथेच मुक्कामी राहिले. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. रायगड आणि नाशिकच्या पालमंत्रिपदावरून शिवसेना नाराज आहे, त्यामुळे शिंदेही नाराज असल्याचे म्हटले जातेय. काहींच्या मते एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.

मंत्रिमंडळातील ४ महत्त्वाचे निर्णय -

  • गृह विभाग - महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी

  • अन्न, नागरी पुरवठा विभाग - राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

  • विमानचालन विभाग - सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

नाराज भरत गोगावलेंची दांडी? -

एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावलेही आजच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. रायगड जिल्ह्यात १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिले, आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे गोगावले नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली बोललं जातेय. गोगावले यांनी नाराजीचे वृत्त फेटाळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

Maharashtra Live News Update: - कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव नतंर अमरावतीत सुद्धा 15 ऑगस्टला मटन चिकनची विक्री बंद

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT