Maharashtra Budget session 2023 saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2023: "वंदे मातरम्"नंतर "जय जय महाराष्ट्र माझा"ने होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

Maharashtra Budget session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे.

Chandrakant Jagtap

>>सुशांत सावंत

Maharashtra Budget session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आता अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.

दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ आणि त्यानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत वाजवले किंवा गायले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून नुकतीच “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला मंजुरी मिळाली आहे. आता त्यामुळे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ते वाजणार आहे.

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून वाजणार आहे. या गीताचा अवधी १ मिनिट ४१ सेकंद असेल. हे राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंदांत गायले किंवा बँडवर वाजवले जाईल आहे.

ही चरणे वाजवली किंवा गायली जातील

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT