एका कर्मचाऱ्या उपचाराअभावी मृत्यू झाला असा, आरोप रुग्णाचे नातेवाईक करत आहेत. रुग्णाला दोन तास बसवून ठेवल्यामुळे आणि डॉक्टर नसल्यामुळे त्या रुग्णाचा जीव गेला असा आरोप रुग्णाचे नातेवाईक करत आहेत. जोवर कारवाई होत नाही तोपर्यत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. तसेच अशा घटना खूपवेळा झाल्या आहेत, असाही आरोप करण्यात येतोय. रुग्णालयात सध्या तणाचाचे वातावरण असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे रूग्णालयात दाखल झालेत.
बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र धावपट्टू अविनाश साबळे हा स्टेपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. काही वेळात या अंतिम फेरीचा सामना पॅरिस येथे सुरू होणार आहे. तर यापूर्वीच अविनाश साबळे यांच्या वडिलांसह कुटुंब आणि ग्रामस्थ हे टीव्ही लावून स्पर्धेकडे लक्ष देऊन आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा हे गाव अविनाश साबळे याचं असून आता संपूर्ण गावासह देशाचे लक्ष पॅरिस येथे सुरू असणाऱ्या स्पर्धेकडे लागलेलं आहे. त्यामुळे आता अविनाश साबळे हे देशाला गोल्ड मेडल मिळवून देणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेलं आहे..
नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात एक कार डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरली. ही कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी असल्याची माहिती आहे. कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. भोकरचा कार्यक्रम आटपून ताफा नांदेड विमानतळाकडे येत होता.
सेट जॉर्ज रुग्णालयात एका रुग्णाचा संशयास्पद मृत्यू झाला असून रुग्णाच्या नातेवाईकाकडून रुग्णालयात गोंधळ घातला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
जालन्यातील रामनगर-मानेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय. दरम्यान दुचाकीला आग लागल्यानंतर पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विजवली असून कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
20 ते 21 वर्षीय तरूणीचा मृतदेह असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर तरुणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली असून हत्येनंतर प्रियकराने खाडीत उडी घेवून स्वतः देखील आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तरूणी सीवूड येथील राहणारी होती, तर मुलगा पेंधर गावातील रहिवासी आहे.एनआरआय पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
नांदेड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना धाराशिव प्रमाणे येथेही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
पुण्यात पीएचडी फेलोशिप संदर्भात शासनाने घेतलेला 50% फेलोशिपच्या राज्यशासनाच्या भूमिकेविरोधात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आक्रमक भूमिका घेत शासनाच्या ५०% च्या जीआरची होळी केली.हा निर्णय बदलला नाही आणि निर्णय धोपवण्याचा प्रयत्न केला तर सामोहिक आत्मदहनाचा इशाराही विद्यार्थांनी दिला.या नंतर बार्टी संचालक सुनील वारे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
लाडकी बहीण योजना सुरू करून मत मिळवण्यासाठी केविलवाना प्रयत्न केला जात आहे. इतर विभागांचे पैसे खर्च करून ही योजना राबवली जाते आहे. मात्र 15000 पेक्षा जास्त मुली बेपत्ता आहेत, सरकारने महाराष्ट्रातील मुलींचे संरक्षण करावं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे. आगामी विधानसभेत मालेगाव मध्यची जागा परंपरागत काँग्रेसची असल्याने त्यांना संधी मिळणार नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागलं आहे.नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव(कुऱ्हाडा) आणि धामदरी यागावी श्रीजया चव्हाण नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेल्या होत्या. परंतु त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घातला.
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भामरागड आल्लापल्ली या मार्गावरील चंद्रा आणि कुकडेली या नाल्यावरील पर्यायी मार्ग वाहून गेल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चंद्रा आणि कुकडेली या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो, मात्र मी जर पिसाळलो तर लय अवघड होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. एकदा सांगा पडायचे का सगळे, 29 तारखेला या अंतरवाटीला सगळे, असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार मेळावा. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.. लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत आहेत... या दरम्यान लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी राज ठाकरे यांची भेट घेत विविध मागण्या मांडल्या आहेत. .. तृतीयपंथी समाजासाठी लातूर जिल्ह्यात कुठलेही स्मशानभूमी नाही., तसेच ते राहण्यासाठी घराची व्यवस्था नाही.. अशा अनेक मागण्या यावेळी राज ठाकरे समोर त्यांनी मांडले आहेत
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 88,575 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. सविस्तर प्रकल्प अहवालदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये तयार झाला होता. अलिकडेच मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पाठपुरावा केला होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विनेश फोगाट यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. हरियाणातील विनेशच्या घरी भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र सह सहा राज्यातील विस्तारलेल्या पश्चिम घाटाच्या पर्यावरण नियमदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चितीच्या सहाव्या अधिसूचनेमध्ये पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 413 गावांचा समावेश करण्यात आला आहे. संवेदनशील क्षेत्राच्या यादीत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसा या प्रकल्पावर बंदी राहणार आहे.या भागात नवीन वीज निर्मिती,धरण उभारणी,औद्योगिक प्रकल्पावर ही निर्बंध लागू राहणार आहेत.
माजी खासदार पुनम महाजन यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणूक पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्वल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून संधी देण्यात आली होती. या भेटीनंतर पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल.
राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाबाजानी दुर्राणी यांची शरद पवार गटात घरवापसी होणार असल्याचं समोर येतंय. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बाबाजानी दुराणी दाखल झालेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. दुराणी यांनी शरद पवार गटातून पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तैयारी दर्शवली आहे. तसेच शिंदे गटावर त्यांनी टीका केली आहे.
लोकसभेत जातीय जनगणा करण्याची मागणी लावून धरणाऱ्या विरोधीपक्षनेते तथा काॅग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जात भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी विचारली. याच्या निषेधार्थ यवतमाळ इथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी यांना खासदार अनुराग ठाकूरवर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात निवेदन दिले.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांचे नाव वापरून पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक. मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने १० लाख रुपये उकळले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत फसवणूक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. मोदींनी पीटी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी कोणते पर्याय आहेत याची चाचपणी केली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले.
राज्यातील साखर कामगारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ साखर कामगारांनी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला आहे. साखर आणि जोडधंद्यातील कामगारांना सत्वर पगारवाढ देण्याचा निर्णय करण्यात यावा. साखर आणि जोडधंद्यातील कामगारांना वेतन आणि सेवा शर्ती ठरविणेबाबत लवकरात लवकर शासनाने त्रिपक्षीय कमिटी गठित करावी, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील २ राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. उदयन राजे भोसले आणि पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या २ जागांवर ही निवडणूक होणार आहे.
बांगलादेशमधील परिस्थितीचा मोठा फटका सध्या कांद्याला बसताना पाहायला मिळतोय. भारत-बांगलादेश सील असल्यानं अनेक ट्रक कांदा सीमेवर अडकून पडल्याने कांदा व्यापारी चिंतेत सापडलेत, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार असल्यानं केंद्र सरकारने याबाबत मध्यस्थी करून निर्यात खुली होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने आणि चार दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरून नेली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
तळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा येतोय. तासाभरापासून दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प असून प्रवासी अडकून पडले आहेत.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो
बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी सिम्बायोसिस विश्वभवन सभागृह येथे पार पडणार पुरस्कार सोहळा
संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी घेतली भेट
शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी घेतली भेट
पुण्यातील पालिकेच्या वसतिगृहाला आग
पुण्यातील घोले रोडवर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात आगीची घटना
वस्तीगृहाच्या जिन्या शेजारी असलेल्या विद्युत मीटरला ही आग लागली
आज सकाळी लागली आग
आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
मनू भाकर भारतात दाखल झाली आहे. मनू भाकरचं मोठ्या उत्साहात दिल्लीत स्वागत केले जात आहे. मनूला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे.
- बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
- मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात
- इथे असणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्या केंद्रावर छापेमारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 दिवसात 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 13 हजार 800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर दूध भेसळ समितीने ही कारवाई केली आहे.
पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा पुन्हा हातोडा
शहरातील धायरी ,आंबेगाव परिसरात महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई
धायरी परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या अनेक अनधिकृत इमारती महापालिकेने केल्या जमीन दोस्त
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई
नागपूरच्या इतवारी परिसरातील तींनल चौकातील अत्तराच्या दुकानाला आग लागली.
पहाटेच्या वेळी आग लागल्याचा अंदाज आहे,
अत्तर दुकान असल्यानं केमिकल वापर होत असल्यान आग वाढली.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. पाण्याचा मारा सुरू आहे.
पावसाने पुन्हा एकदा पुण्यात हजेरी लावली
पुणे शहरात श्रावण सरी बरसायला सुरुवात
पुणे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरात रीम झिम पावसाला सुरुवात
सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण
पुण्याला आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यातील खराडी परिसरातील एका सोफा फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत.
पुण्यातील राजस सोसायटी चौकाकडे जाणाऱ्या कात्रज चौकातील पुलावर एकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. एक ओला दुचाकीचालक निनाद प्रेमकुमार तळेकर हा कात्रज चौकाकडून पुलावरून चालत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला धडकला. त्यानंतर बाजूला असलेल्या संरक्षक जाळीला धडकून रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.