राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांचं भाजपमध्ये दमदार पुनरागमन झालंय. जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून राम माधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राम माधव यांच्यासोबत जी किशन रेड्डी यांच्यावर देखील प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. पुढील महिन्यात जम्मू काश्मीरमधे विधानसभेच्या 3 टप्प्यात निवडणुका होत आहेत. यापूर्वी देखील राम माधव यांच्यावर जम्मू काश्मीरची जबाबदारी होती.
पुण्यातील बेलबाग चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. समस्त पुणेकरांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूर घटनेतील आरोपीला फाशी द्या अशी मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे.
गेल्या सहा तासांपासून गोव्याला जाणारे प्रवासी खोळंबले आहेत. SG 185 पुणे ते गोवा स्पाइस जेट या कंपनीचे विमान आहे. दुपारी साडेबारा वाजता पुण्याहून गोव्याकडे जाणारे स्पाइस जेट या कंपनीचे विमान अद्यापही पुण्यातच आहे.
आज बदलापूर विषयी झालेल्या आंदोलनाचा मोठा फटका मध्य रेल्वेला बसला
सकाळपासून आतापर्यंत 42 लोकल रद्द करण्यात आल्यात. तसेच 15 एक्सप्रेस गाड्या या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
बदलापुर प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचलं. सुमोटो अंतर्गत दखल घेण्याची विनंती केली. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानं सुनावणी घेण्यास व्यक्त असमर्थता व्यक्त केली. याचिकाकर्ता वकिलाला योग्य खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश दिले.
बदलापूर घटनेची NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) ने स्वतःहून दखल घेतली. महाराष्ट्रचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला. गुन्हा नोंदवण्यात उशीर होण्यामागील कारण, त्याची स्थिती आणि पीडित मुलींच्या आरोग्याचा समावेश या गोष्ट अहवालात अपेक्षित आहेत.
बदलापूर येथील चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. एक महिन्याच्या आत आरोपींना फासावर लटकवा आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे 12 एक्स्प्रेस ट्रेन आणि ३० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंतच सुरू आहे. लोकलला प्रचंड गर्दी आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २ जणांना आता २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंतीक्रमाने शाळेची निवड केली आहे. यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेले ६४३ जण आहेत. मात्र रयत शिक्षण संस्थेकडून या शिक्षकांना रुजू करुन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
भाजपच्या राज्यसभा उमेदवाराचे नाव आज जाहीर होणार आहे. विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, आशिष देशमुख आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा आहे. विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.
पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.दुपारी दोन वाजता त्यांचं नांदेड विमानतळावर आगमन झाल्या नंतर त्यांनी नांदेड येथील जग प्रसिद्ध असलेल्या गुरुद्वारा येथे जाऊन परिवारासोबत दर्शन घेतले.गुरुद्वारा बोर्डा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेला शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर तेथील शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत त्यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त श्री.सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला आहे.
सिर्सी उमरेड मार्गावरील वळणावर ट्रक चालकाच नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. यात एक जण ठार झालाय. चालक गंभीर जखमी झाला असून तर क्लिनरचा मृत्यू झालाय. हिंगणघाटकडून सिर्सीकडे कपाशीचा गठाण घेऊन जाणारा ट्रक उलटला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा कडेला उतरून ट्रक पलटी झाला.
शेतकऱ्यांना लावलेली "ई पिक पाहणीची" जाचक अट रद्द करा, या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी लक्षवेधी धरने आंदोलन केले आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अकाउंटवर पैसे येण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षा असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी असल्याशिवाय अकाउंट वर पैसे येत नसल्याने महिलांना केवायसी करण्यासाठी मोठी गर्दी होत असून महिलांचे हाल होत आहेत.
बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान परळीत हा कृषी महोत्सव भरणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत या कृषी महोत्सवाचे आयोजन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन उद्या होणार आहे. बाजार समितीच्या मैदानात हा कृषी महोत्सव पार पडणार आहे. या कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने परळीत जोरदार तयारी झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे 40 फुटांचे लावलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका डिलिव्हरी बॉयला पार्सल उशिरा दिले म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारल्याची घटना घडलीय. या मारहाणीत त्या डिलिव्हरी बॉयचे अंग सुजले, तोंड फुटले आहे. याप्रकरणी आता सिडको पोलीस ठाण्यामध्ये त्या कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील जितेंद्र नावाचा तरुण वृत्तपत्र विक्रेता आहे
मुंबई सह देशभरात घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फोटोग्राफरच घर फोडून घरातील लॅपटॉप चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास करताना कस्तुरबा मार्क पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली
बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहे तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. खरं सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवर उडाला आहे पोर्षे कारचे प्रकरण, वरळीतील वीरशहाचं आणि पनवेल ची घटना असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहे अस टोला त्यांनी लगावलाय. महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या, तुम्हाला खरच लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या सुरक्षित असेल तरच त्यांना अश्वस्त वाटेल अस सुषमा अंधारे यांनी म्हटलय.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत. गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जातेय , जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
तुरूंगातून सुटल्यानंतर अद्वय हिरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल.मालेगाव ग्रामीणमधून अद्वय हिरे इच्छुक असून त्यांनी लोकसभेपूर्वी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटातील प्रवेशानंतर रेणुका सुतगिरणी कर्जप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
बदलापूर बाल अत्याचाराचे राजधानी दिल्लीत पडसाद
राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल
बालहक्क आयोग एक तपास पथक बदलापूरला पाठवणार
विधानसभा निवडणूक जवळ येताच परभणीतुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढलीय, परभणी तालुक्यातील कारेगाव येथील सरपंच अप्पाराव वावरे हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन आपल्या हजारो समर्थकांना घेऊन मुंबईच्या दिशेने शिवसेनेत प्रवेशासाठी रवाना झालेत.उद्या दुपारी त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर होणार आहे. यावेळी अप्पाराव वावरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे परभणी विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी करणार आहेत .वावरे हे यापूर्वी शिवसेना UBT पक्षाचे निकटवर्ती पदाधिकारी होते...शिवसेना उबाटा गटाला मोठा धक्का असून परभणी विधानसभेत चूरस वाढणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय पैलवान मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर दुसऱ्यांदा ईडीची कारवाई सुरू आहे. चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे. पुण्यातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ही धाड पडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता येथे आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेचा निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी या निषेध मोर्चात सहभागी होत पश्चिम बंगाल सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ...
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कळवा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शेळके (४२) असे त्या नराधमाचे नाव असुन एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पिडित मुलीवरील अनर्थ टळला आहे. आईसोबत काल कळवा रुग्णालयात आलेली ११ वर्षीय मुलगी आली होती.
बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलीस पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मागण्या मान्य करू, आंदोलन मागे घ्या अशी भूमिका पोलिसांनी घेतलीय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज 12.30 वाजता मातोश्री येथे भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरी विधानसभेतील नेते रवी लांडगे पक्ष प्रवेश करणार आहेत
बदलापूर अत्याचार प्रकरणी शहरात दोन तासांपासून आंदोलन सुरू आहे, आता पोलिसांची कुमक रेल्वे स्टेशनवर दाखल झालीय.
अजित पवारांचे निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी इडीची कारवाई सुरु आहे. पुणे आणि शिक्रापुर येथील निवासस्थानी कारवाई सुरुय. चार वर्षात दुस-यांदा ed ची कारवाई होत आहे.
बदलापूरमध्ये दोन तासांपासून रेल रोको करण्यात आलाय. जमाव अत्यंत आक्रमक झालाय. पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बदलापूर अत्याचार प्रकरणी फास्टट्रॅक कोर्टात आजच खटला सादर करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 21 ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका घेणार असून जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांशी ही चर्चा करणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकच्या मालेगावमध्ये बंद पुकारण्यात आलाय .सकल हिंदू संघटना, सामाजिक संघटनांनी हा बंद पुकारला असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रामसेतू पुला जवळील राम मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त सर्वत्र लावण्यात आला आहे. तर जिल्हा पोलीसप्रमुख स्वतः सर्वत्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या अधूनमधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान मोठे वाहतूक कोंडी झालीय. गोरेगाव,जोगेश्वरी,अंधेरी,विलेपार्ले दरम्यान वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे.
२०२५ च्या जानेवारी महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार स्वीकारणार
महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार
भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नाव राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत
सूत्रांची माहिती
बदलापूर अत्याचार प्रकरण : आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. यामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर असणार आहे.
ते दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घेणार भेट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची भेट महत्वाची
राज्यसभा पोटनिवडणूक भाजपच्या उमेदवारांच्या नावावर देखील आजच शिक्कामोर्तब होणार
उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
मागच्या आठवड्यात झालेल्या केंद्रीय बैठकीला बावनकुळे आले नव्हते त्यामुळे बावनकुळे यांचा आजचा दिल्ली दौरा महत्वाचा
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी हिंगोलीच्या कळमनुरी शहरात मध्यरात्री रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पॉर्शे अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणी आणखी दोघे अटकेत आहेत.
आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी दोघांची नावे आगहेत.
अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबतच आणखी दोघा अल्पवयीन मुलांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आली होती.
याप्रकरणी त्या मुलांचे वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली.
दोघांनाही आज न्यायालयात करणार हजर...
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक,
पोलिसांकडून वाहतूक कोंडीबाबत सूचना जारी
नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल आणि १० ताशांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोलकत्ता महिला डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरण
पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केली SIT
आरजीकर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी SIT स्थापन
एका महिन्यात समिती अहवाल सादर करणार
पोलिस महानिदेशक डॉ. प्रणव कुमार SIT प्रमुख असून इतर 3 सदस्य SIT समितीत असणार
शाळकरी मुलींच्या अत्याचाराविरोधात आज बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेच्या निषेध करण्यासाठी शाळेबाहेर पोहोचले आहेत. नागरिकांकडून निषेधाच्या घोषणा देण्यात येत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे.
पुण्यातील खडकवासला जॅकवेल, नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अन्य ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. यामुळे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल.
वाशिम जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवस सतत पाऊस झाल्यानंतर आता वातावरणातील बदलामुळे मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात सकाळी धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे सोयाबीन,हळद या पिका बरोबर भाजीपाला पिकाला फटका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.