Jalna Bus Truck Accident News Saamtv
महाराष्ट्र

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, ता. २० सप्टेंबर

Jalna Bus Trauck Accident Update: जालन्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालना ते वडीगोद्री मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये हा भयंकर अपघात झाला. अपघातात ३ ते चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाले आहेत, मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे.

जालन्यात बस- ट्रकची धडक..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांचे सत्र सुरु आहे. आज (शुक्रवार, ता. २० सप्टेंबर) सकाळीच मुंबई- पुणे एक्सप्रेसवर तीन वाहनांमध्ये धडक झाल्याची घटना घडली होती. अशातच जालन्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालना ते वडीगोद्री मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

३ ते ४ जणांचा मृत्यू...

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस गेवराईकडून जालन्याच्या दिशेने जात होती तर मोसंबी भरलेला आयशर जालन्याकडून गेवराईच्या दिशेने येत होती. यावेळी अंबड वडीगोद्री रस्त्यावर मठ तांडा येथे दोन्ही वाहनांमध्ये समोरा-समोर धडक झाली. बसमध्ये एकूण 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामध्ये ३ ते ४ जण दगावल्याचे सांगण्यात येत असून अनेक जण जखमी झाले आहेत.

गाड्यांचा चक्काचूर...

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना तसेच मृतांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. अपघातातील मृतांचा नेमका आकडा आणि नावे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT