sunil kedar News saam tv
महाराष्ट्र

Sunil Kedar News: मोठी बातमी! नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात काँग्रेस नेते सुनील केदार दोषी; २२ वर्षांनी लागला निकाल

Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २२ डिसेंबर २०२३

Nagpur District Bank Scam:

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. यामधील तिघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

सुनील केदार यांना मोठा धक्का...

बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील (Nagpur Bank Scam) १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (शुक्रवार, २२ डिसेंबर) सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सत्र न्यायायलाच्या अतिरिक्त न्यायाधीश जे व्ही पेखळे- पुरकर यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, सुनील केदार यांना दोषी ठरवल्यानंतर कोर्ट काय शिक्षा सुनावणार? याकडे लक्ष लागले आहे. सुनील केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना शिक्षेत कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे.

काय आहे नागपूर बँक घोटाळा?

२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटींहून अधिक रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. सुनील केदार हे या प्रकरणात सहआरोपीही होते. आता २२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून यामध्ये सुनील केदार हे दोषी आढळलेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT