Sunil Kedar Latest News Saam TV
महाराष्ट्र

Sunil Kedar News: ब्रेकिंग! कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Sunil Kedar Granted Bail In Nagpur Bank Scam: नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांच्याबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ९ जानेवारी २०२४

Sunil Kedar Nagpur Bank Scam News:

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांच्याबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला असून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५० कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना १२ लाख ५० हजारांचा दंड आणि ५ वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेविरोधात सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. सुनील केदार यांच्या जमीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडली. राज्य सरकारने या जामीन अर्जाला विरोध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT