Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत होणार भेट

Namdeo Kumbhar

Dhangar reservation : धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत होणार भेट

धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. आंदोलन करणाऱ्यांधील काही जणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटायला बोलवले. काही वेळापूर्वी धनगर समाजातील नेत्यांनी वर्षा निवासस्थानी बाहेर आंदोलन केले होते.

Dhangar reservation : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले धनगर आंदोलक

मुंख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धनगर आंदोलक पोहोचले. आरक्षणासाठी धनगर आंदोलक आक्रमक झाले आहेत. वर्षा बंगल्यात बाहेर देखील त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

Haryana News :  हरियाणातील विजयानंतर भाजपा आणखी आक्रमक; बैठकांमध्ये जल्लोष

- भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

- देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी होत आहेत बैठका

- दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, शिवप्रकाशजी, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती.

-हरियाणातील विजयानंतर भाजपा आणखी आक्रमक, बैठकांमध्ये जल्लोष

- पूर्ण ताकदीने कामाला लागली भाजपा

Ajit Pawar News : अजित पवार बारामतीतूनच लढणार, प्रफुल्ल पटेलांची माहिती

अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Ganpatrao Deshmukh News : दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू शरद पवारांच्या भेटीला

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मधून दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू पवारांचे भेटीला

बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख पवारांच्या भेटीला

सांगोला मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक

Ratnagiri News : रत्नागिरीत सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते एमएससीबी कार्यालयात

रत्नागिरी- महावितरणच्या तरुण कंत्राटी कामगाराचं मृत्यू प्रकरण

सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते एमएससीबी कार्यालयात

एमएससीबी अधिकारी कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी चर्चा सुरू

बेजबाबदार ठेकेदारावर कारवाईची मागणी, केली आहे.

नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, प्रमुख मागणी

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात

मिरा भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट परिसरात कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. न्यू गोल्डन नेस्ट येथील हनुमान मंदिर येथे सकाळी 5 च्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या कारने ऑटोला मागून धडक दिली. सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून रिक्षा व कारचे मोठे नुकसान झाले आहे. गोल्डन नेस्टकडून इंद्रलोक कडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला.

Yavatmal News: पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

यवतमाळ ते पांढरकवडा कडे जाणाऱ्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून दोन दिवसापूर्वी खड्ड्यामुळे अपघात होऊ नका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चरडे, एक्स मॅन आर्मी अशोक बोंद्रे यांनी स्वखर्चातून खड्डे बुजवून खाकितील माणुसकीचे दर्शन दिले त्यामुळे झोपेचं सोंग घेऊन बसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय.

Nanded News:  तहसीलदारसह अधिकारी कर्मचारी गैर हजार,आंदोलकांनी घेतला कार्यालयाचा ताबा,व्हिडीओ व्हायरल.

तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या सह अधिकारी अकर्मचारी गैर हजर असल्याने आपल्या न्याय हक्क मागणीसाठी आलेल्या महिला आंदोलकांनी चक्क तहसीलदार यांच्या खुर्चीचा ताबा घेतला.नांदेडच्या हिमायतनगर तहसिल कार्यालयातील हा प्रकार आहे.या आंदोलकां मधली एक महिला तहसीलदार यांच्या खुर्चीवर जाऊन बसली.त्यांसोबतच इतर अधिकारी आणि कर्मचारी नसलेल्या खुर्च्यांवर इतर महिला आंदोलक जाऊन बसल्या.प्रहार संघटने तर्फे आज हिमायतनगर तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.वृद्ध निराधार महिलांनी आपल्या मागण्यासाठी नांदेडच्या हिमायतनगर तहसिल कार्यालयावर मोर्चा.तहसिल कार्यालयात तहसीलदार आणि अधिकारी कर्मचारी गैर हजर आल्याने तहसीलदार यांच्या खुर्ची सह तहसिल कार्यालयावर या महिला आंदोलकांनी ताबा घेतला होता.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sangli News:  विधान परिषद सभापती नीलम गोरे यांनी घेतली साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षा तारा भवळकरांची भेट

विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी सांगलीमध्ये आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्ष तारा भवाळकर यांची भेट घेतली आहे.राजकारण व साहित्याच्यापलीकडे तारा भवाळकर यांच्याशी आपल्या नातं असल्याचं यावेळी निलमताई गोरे यांनी स्पष्ट केले.तसेच मराठी भाषेला अभिजीत दर्जा मिळावा, अशी मागणी नेहमीच साहित्य संमेलनामध्ये केली जायची, मात्र आता साहित्य संमेलनाच्या आधी ते मिळाले आहे,हे खूप आनंदाची गोष्ट असून,हे साहित्य संमेलन पार पडत असताना,तारा भावाळकर सारख्या महिला साहित्यिकाची निवड होते,ती खूपच गौरवाची बाब असल्याचं,स्पष्ट करत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काही जणांच्याकडून करण्यात येणाऱ्या टिकेवरून बोलताना केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी वक्तव्य करणे हे उचित नाही,मराठी भाषा ही अनुदानाच्या पलीकडे असल्याचं देखील मत नीलमताई गोरे यांनी यावेळी स्पष्ट केला.

Pune News:  धक्कादायक! घरातील सिलेंडर सुरु करत स्वतःल कोंडून घेतलं

प्राथमिक माहितीनुसार, महर्षीनगर, झांबरे पॅलेस शेजारी असणाऱ्या एका रहिवाशी इमारतीत राहत असलेल्या एका तरुणाने घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु करत व वस्तु फेकत धोका निर्माण केला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्ध्या तासात सुखरुप सुटका करत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा तरुण मानसिक रित्या आजारी असल्याचे समजत आहे

Pune News : शरद पवार आणि सुप्रिया सुळे बोपदेव घाटाची करणार पाहणी

पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी ३ नराधमांनी एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. सामूहिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना अजून आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बोपदेव घाट परिसरात भेट देणार असून घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

Bharat Gogawale : हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक - भरत गोगावले

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपची सुरुवातीला पिछेहाट झाली होती. मात्र, अर्ध्या तासांतच भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसचे सध्या अनेक उमेदवार पिछाडीवर असून भाजपची बहुतमाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अशातच हरियाणाच्या निकालानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे, असा टोला भरत गोगावले यांनी हाणला आहे. भाजपच मोठा भाऊ असून शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांचे सहकारी आहेत. राज्यात देखील असंच चित्र पाहिला मिळेल. आम्ही एवढी विकास कामे केली आहेत त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार येणार आहे, असंही गोगावले यांनी म्हटलं आहे.

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुरकुटे यांना अटक केली आहे. पीडित महिला मुरकुटे यांच्याकडे नोकरीला होती. २०१९ पासून मुरकुटे यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे.

Beed News : राज्यात सर्वाधिक लाभार्थी शेतकरी संख्येच्या बाबतीत बीड जिल्हा अव्वल

बीड जिल्ह्यात, सोयाबीन...कापूस अर्थसहाय्य योजनेत तब्बल 157 कोटींचे वाटप झाले आहे.या योजनेचा फायदा राज्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला असून लाभार्थी शेतकरी संख्येमध्ये बीड जिल्हा राज्यात अव्वल आहे..तब्बल 6 लाख 27 हजार 149 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळालाय. यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार अन दिलासा मिळाला आहे

Nashik News : नाशिकच्या वंजारवाडी परिसरात बिबट्या पडला विहिरीत

नाशिकच्या वंजारवाडी परिसरात भाऊसाहेब शिंदे या शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडला आहे. या बिबट्याला वाचवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी दोर आणि टायर पाण्यात टाकले आहेत. बिबट्याने तोंडाच्या साहाय्याने दोर पकडून ठेवला असून वन विभागाचे अधिकारी त्याला वाचवण्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात रेस्क्यू करून बिबट्याला बाहेर काढले जाणार आहे.

Maharashtra Sadan : अयोध्येतील महाराष्ट्र सदनचे आज भूमिपूजन

अयोध्येतील महाराष्ट्र सदनचे आज भूमिपूजन केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. शरयू नदीजवळ महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीराम दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सदनची निर्मिती करण्यात येत आहे.

Gondia News : गोंदियात पकडला लाखोंचा गांजा, दोन आरोपी गजाआड

रायपुरकडन नागपूरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून देवरी पोलिसांनी नाकाबंदी करत लाखोंचा गांजा जप्त केला. ज्यामुळे परराज्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपींना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले .

Marathi News Live Updates : महायुतीमध्ये आठवलेंचा पक्ष नाराज

महायुतीमध्ये आठवलेंचा आरपीआय पक्ष देखील नाराज.

288 जागा स्वबळावर लढण्याचा दिला इशारा.

आर.पी.आय चे केंद्रीय सचिव सुरेश बारशिंगे यांची प्रतिक्रिया.

महायुतीकडे 25 जागांची मागणी केली असून किमान 8 ते 10 जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा.

जर तेवढ्या जागा देखील मिळणार नसतील तर आर.पी.आय विधानसभेच्या सर्व जागा लढविणार.

आम्ही आमच्या चिन्हावरच निवणुका लढविणार असून आम्हाला आमची ताकद यामाध्यमातून कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मृतदेहाचा पंचनामा करायला गेले अन् पोलीस उपनिरीक्षक पुलावरून खाली पडले; प्रकृती चिंताजनक

अखेर झुकावं लागलं! पाकिस्तान नव्हे, तर या देशात होणार Champions Trophy ची फायनल

Byculla Building Collapse : मुंबईतील भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळला; परिसरात धावाधाव,VIDEO

Navratri 2024: नवरात्रीच्या आठव्या दिवशी करा 'हे' उपाय मिळवा देवीचा आशिर्वाद

IND vs BAN 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? हा खेळाडू करु शकतो पदार्पण

SCROLL FOR NEXT