Maharashtra News Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam 2026 Form : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख ठरली, किती असेल फी?

SSC Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी परीक्षा २०२६ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. अर्ज १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन भरता येणार आहेत.

Alisha Khedekar

  • दहावी परीक्षा २०२६ अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू

  • अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर

  • नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने वेळेत भरण्याचे आवाहन मंडळाकडून

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शालेय जीवनातील अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार पासून सुरू होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या महत्त्वाच्या परीक्षेला बसतात आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष या प्रक्रियेकडे लागलेले असते.

या वर्षीही दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेन-आयडीवरून त्यांच्या शाळांमार्फत भरले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा पेन-आयडी क्रमांक वेगळा असल्याने त्याद्वारे सर्व माहिती थेट मंडळाच्या डेटाबेसशी जोडली जाईल. यामुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व गती येणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.

फक्त नियमित विद्यार्थीच नव्हे, तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच मोजके विषय निवडणारे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थीही यामध्ये समाविष्ट आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध होणार असून, संबंधित शाळा प्रमुखांनी हे अर्ज वेळेत ऑनलाइन भरून घेणे आवश्यक असल्याचं मंडळाने सांगितलं आहे.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत असेल. या परीक्षेची फी १५०० इतकी आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी कोणत्याही कारणास्तव विलंब न करता अर्ज भरून पूर्ण करावेत. यानंतर उशिरा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे शाळा प्रमुखांवर वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी येणार आहे.

दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विविध पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगून, नाव, विषयांची निवड, फोटो, स्वाक्षरी अशा सर्व बाबी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाणा पोलीस दलातील "किशोर कुमार" हरपला..!

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये, पाहा डोळे दिपवणारे फोटो

SCROLL FOR NEXT