HSC SSC Exam Update  Saam Tv
महाराष्ट्र

HSC SSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ! दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मिळणार एक्स्ट्रा 10 मिनिटे...

Maharashtra Board Exam : या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.

कोमल दामुद्रे

Supplementary Exam : जून महिन्यात दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला. यात अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.

पूर्वी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत १० मिनिटे वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. परंतु, वाढत्या कॉपीच्या प्रकारामुळे २०२२-२३ च्या परीक्षेत हा वेळ काढून टाकण्यात आला. पण या गोष्टींचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा वेळ पुरवणी परिक्षेत देण्यात येणार आहे. या वेळेमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगले यश मिळवायची ही सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, मुंबई (Mumbai), लातूर, पूणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, अमरावती आणि नाशिक या नऊ मंडळातर्फे दहावी (SSC)-बारावीची पुरवणी परीक्षा (Exam) होणार आहे. ही परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणार आहे.

इयत्ता १२ वीसाठी लेखी परीक्षा मंगळवारी १८ जुलै २०२३ ते मंगळवार ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंगळवार १८ जूलै २०२३ ते शनिवार ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेतली जाणार आहे. १२वीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावी पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT