BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute Dies of Heart Attack : भाजपचे राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आज मध्यरात्री दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या या अचानक निधनाने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
असा होता राजकीय प्रवास
रामराव वडकुते यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी विधानपरिषदेचे आमदार, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.
महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एक अभ्यासू आणि मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती. तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे खासदार असा त्यांचा प्रवास राहिला. त्यांच्या निधनामुळे धनगर समाजासह हिंगोली जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून, सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
रामराव वडकुते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पक्षातील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून संधी देण्यात आली. यासोबतच त्यांनी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे कामकाज पाहिले. पुढील काळात त्यांनी भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेत पक्षात प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या या कामाची पावती म्हणून २०२६ मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.