Vijay Wadettiwar  Saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar News: ललित पाटील प्रकरणावरुन विरोधक आक्रमक, 'हे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत रॅकेट...' वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

Vijay Wadettiwar On Lalit Patil Case: "सरकारमधील मंत्र्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच ललित पाटील सारख्यांना पळून जाण्यासाठी सपोर्ट केला जातो.." असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी| ता. १८ डिसेंबर २०२३

Maharashtra Assembly Winter Session 2023:

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. अंतिम आठवड्यातील या सुनावणीत राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

त्याआधी आज (सोमवार, १८ डिसेंबर) ललित पाटील प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. ललित पाटील प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका मांडत सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"राज्यात ड्रग्ज प्रकरणे उघडकीस येत आहेत. उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र होतोय. याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला. तसेच याला सरकारमधील मंत्र्यांचा सपोर्ट आहे, म्हणूनच ललित पाटील सारख्यांना पळून जाण्यासाठी सपोर्ट केला जातो.." असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकार पुरस्कृत रॅकेट..

तसेच "ड्रग्ज प्रकरणात गुजरातच्या (Gujrat) कनेक्शनमुळे गुजरात संरक्षण देण्याचे काम केलं जाते आहे. शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेले आहे. ललित पाटीलला (Lalit Patil) यावेळेस संरक्षण मिळाले हॉस्पिटलमधून पलाईन केले. त्यानंतर ती कारवाई झाली. हे सर्व सरकारचे ढोंग आहे. सरकार हे सर्व प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न" करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

राज्य ड्रग्जच्या विळख्यात...

"हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्ज तरुणाईच्या विळख्यात घालणारं आहे. सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी हे सर्व अड्डे उद्धवस्त व्हावे यांना कारवाई करावी ही आमची मागणी आहे," असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Cheapest Plans: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

SCROLL FOR NEXT