Maharashtra Assembly Winter Session 2022 : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपुरात दाखल झाले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारचे कानही टोचले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आज सभागृहात आल्यानंतर आपण सोबत पेनड्राईव्ह आणल्याचं सांगितलं. (Latest Marathi News)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, सीमाप्रश्नावर इथे महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना, एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जाण्याची काय गरज होती. बरं ते दिल्लीत गेले, तिथे ते सीमावादावर चर्चा करणार आहेत का? यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह आणल्याची देखील माहिती दिली.
ठाकरेंनी आणलेल्या पेनड्राईव्हमध्ये काय?
उद्धव ठाकरे यांनी सोबत पेनड्राईव्ह आणल्याचं सांगताच सभागृहात काही क्षणात शांतता पसरली होती. उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह यायला लागतात, या पेनड्राईव्हमध्ये 1970 च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केलेली आहे.अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा' (Maharashtra Political News)
तो भाग केंद्रशासित करावा : उद्धव ठाकरे
सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच सुनावलं. नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.