Maharashtra Assembly Session 
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Session: विधानभवनात CM शिंदे-फडणवीस समोर येताच विरोधकांची हातवारे करून घोषणाबाजी, VIDEO

Bharat Jadhav

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. महायुती सरकारचं हे शेवटचे अधिवेशन असून हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. त्यांचा टीझर काल चहापानावरील बहिष्कारावरुन दिसला. आज विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर दिसताच विरोधकांनी हातवारे करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

४० टक्केवारी घेणारं सरकार हाय हाय,'शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, 'शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो 'अशा घोषणा देत विरोधकांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला. मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आक्रमक झाली. त्यांनी पहिलाच विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पाहिजे यासाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कमिशनखोर आणि टक्केवारी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

शेतकऱ्यांची वीज बिल माफी, कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे,अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना

VIDEO : सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावं; संभाजीराजे छत्रपतींना धारेवर धरल

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

SCROLL FOR NEXT