mohit kamboj 
महाराष्ट्र

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Mohit Kamboj On Maharashtra Election Result: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान मतमोजणीच्या आदल्या दिवशी भाजपच्या नेत्याने मोठा दावा केला.

Ankush Dhavre

Maharashtra Vidhansabha Result: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडलं. या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले होते. काही एक्झिट पोलनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टफ फाईट पाहायला मिळाली.

तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असं म्हटलं गेलं होतं. दरम्यान निकालाआधीच भाजपच्या बड्या नेत्याने मोठा दावा केला होता.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी २२ नोव्हेंबर म्हणजेच, निकालाच्या आधीच एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला होता की, भाजप पक्ष एकहाती १२० पेक्षा अधिक जागा जिंकून येणार.

मतमोजणीच्या दिवशी सकाळी १२ पर्यंत काही कल समोर आले आहेत. त्यानुसार भाजपने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांनी पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यात कोणाचं सरकार येणार, हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. दरम्यान मतमोजणीबाबत आणि निकालाबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ' हा कौस कसा म्हणता येईल? काहीतरी गडबड आहे. निकाल लावून घेतले आहेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझ्यासारख्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या माणसांचा यावर विश्वास बसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT