Maharashtra Political News saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

dahanu political news : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसल आहे. मतदानाआधीच त्यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रुपेश पाटील

पालघर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूमधील अधिकृत उमेदवाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी यांच्या पक्ष प्रवेशाने बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

विरारमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ सुरु आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. या आरोपानंतर विरारमध्ये एकच गोंधळ उडाला. हितेंद्र ठाकूर यांनीही या प्रकरणावरून विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केला. मात्र, विनोद तावडे यांनी या आरोपाचं खंडन केलं. या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु असताना बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलं आहे. डहाणू विधानसभा आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी माघार घेत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला आहे. सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आदल्यादिवशी भाजपमध्ये पुन्हा घर वापसी केली आहे.

मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं

दरम्यान, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद भिवा निकोले आहेत. डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. निकोले यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला होता.

यंदा निकोले यांना महाविकास विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजककडून विनोद मेढा रिंगणात उभे आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून सुरेश पाडवी रिंगणात होते. मात्र, मतदानाच्या आदल्यादिवशी सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT