Sambhajiraje Chhatrapati Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींची रायगडमधून मोठी घोषणा, किती जागांवर लढणार, थेट आकडाच सांगितला

Sambhajiraje Chhatrapati On Assembly Election Seat: संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला एकला चलोचा नारा दिला असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी २८८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

Priya More

सचिन कदम, रायगड

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजेच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता त्यांनी रायगडमधून मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्ष २८८ जागांवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिसरी आघाडी नाही. चांगला सुसंकृत पर्याय आहे, असं संभाजीराजे यांनी रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, 'तिसरी आघाडी नाही तर लोकांसमोर चांगला सुसंकृत पर्याय आम्ही घेऊन चाललो आहोत. लोकं अस्वस्थ आहेत, व्यथित आहे. तेच तेच चालू आहे, कोण खुर्द कोणं बुदृक, एकाने दूसरा, एकाने तिसरा विचार मांडायचा हा खेळ चालू आहे.' अशा शब्दात संभाजी राजे यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली. त्याचसोबत, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'स्वराज्य पक्ष सर्वच जागांवर लढण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक लोकं जॉईन होत आहेत पण २८८ हे टार्गेट असेल.'

संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला नुकताच 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली. तसेच या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे निवडणूक चिन्ह दिले आहे. संभाजीराजे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यामुळे हा पक्ष विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले. आता थेट संभाजीराजे यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. संभाजीराजेंनी या निवडणुकीसाठी एकला चलोचा नारा दिला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT