Phulambri Constituency 
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Phulambri Constituency Saam Exit Poll : फुलंब्री मतदारसंघामध्ये अनुराधा चव्हाण आणि विलास औताडे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या राज्यात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. फुलंब्री मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी अनुराधा चव्हाण यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. अनुराधा चव्हाण याठिकाणी निवडून येऊ शकतात.

फुलंब्री मतदारसंघामध्ये भाजपाकडून अनुराधा चव्हाण निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेसकडून विलास औताडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, अनुराधा चव्हाण हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर विलास औताडे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. विलास औताडे यांच्या आव्हानावर अनुराधा चव्हाण यांनी मात केलेली आहे.

भाजपाकडून अनुराधा चव्हाण यांना निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर येथे बंडखोरीला देखील मोठं विधान आलं होतं. विलास औताडे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे थेट दोन्हीमध्ये लढत होणार होती. मात्र यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. बंजखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मताची विभागणी ही नक्कीच होणार हे आपल्याला मतमोजणीच्या दिवशी लक्षात येणार आहे.

दरम्यान, त्याचबरोबर शिवसेनेतून जे बंडखोरी करणारे उमेदवार आहेत रमेश पवार हे खासदार संदिपान भुमरे यांचे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही त्यांनी काम केलेली आहेत. पुढे मताचं जर विभाजन पाहिलं तर मताच्या विभाजनाच्यानंतर निकाल आपल्या लक्षात येणार आहे.

फुलंब्री विधानसभेमध्ये २० नोव्हेंबर रोजी जवळपास ७१.९९ म्हणजे ७२% मतदान झालेलं आहे. २०१९ च्या तुलनेत २ टक्क्यांनी मताचा आकडा वाढलेला आहे आणि मागील गेले १५ दिवस प्रचार करताना उमेदवाराच्या देखील नाकीनउ आलेले आहेत. तर सगळेच विस्तारलेला मतदाकसंघ हा फुलंब्री मतदारसंघ आहे. महायुतीचा कल सकाळच्या सत्रामध्ये तरुणाईचा कल जास्त दिसून आला. तर दुपारच्या सत्रामध्ये वयोवृद्ध आणि सामान्य नागरिक यांचे रांगाच रांगा लागल्या होत्या. आता पुढील २ दिवसांमध्ये निकाल लागल्यावर प्रत्येकाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT