Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024: पुढच्या वारीला पांडुरंगाची महापूजा 'मविआ'चाच मुख्यमंत्री करेल, शरद पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

Mahavikas Aghadi News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी असो वा महायुती यामधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशामध्ये शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडी असो वा महायुती यामधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त जागांवर विजयी व्हावे यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एका बड्या नेत्याचे नाव समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी याबाबत मोठं विधान केले आहे.

'पुढील वारीला महविकास आघाडीचा मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करेल. पांडुरंगाची इच्छा असेल तर मला ही पूजा करायला आवडेल.', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. आज राजेश टोपे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये ठाकूर बुवाची समाधी ते तोंडले बोंडले असा पालखीबरोबर पायी प्रवास केला. यावेळी राजेश टोपे यांनी मृदुंग टाळ वाजवत वारकऱ्यांबरोबर फुगडी घातली. यावेळी साम टीव्हीशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत हे मोठं वक्तव्य केले.

राजेश टोपे यांनी पुढे सांगितले की, 'गेल्या पंचवीस वर्षांपासून माऊलींचे अखंडितपणे दर्शन घेत असतो. दरवर्षीपेक्षा तिप्पट वारकऱ्यांची गर्दी यंदा झाली आहे. वारीमध्ये राजकारण घुसवू नये. सरकारने वारकऱ्यांसोबत चर्चा करावी. वारकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं.', असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी विधान परिषद निकालावर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, 'महायुतीचा अनैतिकतेचा कारभार आहे. आमदारांची फोडाफोडी करून निवडणूक जिंकली गेली. लोकसभेत जनतेच्या मनातला भाव दिसून आला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT