Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

Satish Kengar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी भाजप आणि अजित पवार गटाला एकामागून एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच भाजपचे पुणे प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता.

यानंतर आता शरद पवार यांनी भाजपोल आणखी एक धक्का दिला आहे. भाजपाचे माजी आमदार आणि आटपाडी खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांचा भाजपाला रामराम ठोकला आहे.

राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्याचं जाहीर केलं आहे. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांची सांगलीत भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी भाजप सोडत असल्याचं जाहीर केलं होतं.

भाजपाने आम्हाला शिवसेना शिंदे गटाला विकल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष सोडला आहे. यातच राजेंद्र अण्णा देशमुख यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अजित पवार गटालाही शरद पवार यांचा दणका

दरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार यांनाही धक्का दिला आहे. सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. माजी आमदार सदाशिव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील शरद पवारांना भेटण्यासाठी पोहचले आहेत.

माजी आमदार सदाशिव पाटील आणि वैभव पाटील खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील पिता-पुत्रांनी शरद पवार यांनी भेट घेतली आहे. यातच लवकरच सदाशिव पाटील आणि वैभव पाटील तुतारी फुंकतील, असं जवळजवळ स्पष्ट झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

SCROLL FOR NEXT