Congress Candidate list Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी 'या' तारखेला येणार; कोणाची लॉटरी लागणार?

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असून २० तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

विधानसभा निवडणुका जाहीर होताच काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधासभेच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसमध्ये मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात बुधवारी (ता. १७ ऑक्टोबर) काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असून २० तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील जवळपास ८४ जागांवर चर्चा झाली त्यापैकी ६२ जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली. आता २० ऑक्टोबर रोजी रविवारी होणाऱ्या दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये जागांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असून काँग्रेसची पहिली यादीही २० ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 50 मतदारसंघात एकच नाव आल्यानं उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील विदर्भातील नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकुर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. याबाबत 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात शहर काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशा सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पुढील महिनाभर मतभेद विसरून कामाला लागा, महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेन त्याचा घरोघरी जाऊन प्रचार करा, अशा सूचना यावेळी काँग्रेस नेते, तसेच पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT