milk Glass
milk Glass Saam Tv
महाराष्ट्र

New Year 2023 : द दारूचा नव्हे, दूधाचा; अंनिसकडून नववर्षाच्या स्वागताला आगळावेगळा उपक्रम, दिला महत्वाचा संदेश

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

NashiK News : भारतात नववर्षाच्या जल्लोषाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहे. भारतात यंदा कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल असल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसणार आहे. तरुणाईमध्ये जल्लोष करताना मद्याचा सामावेश विशेष असतो. मात्र, मद्यामुळे होणारे दुष्पपरिणाम पाहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. (Latest Marathi News)

राज्यासहित नाशिककरही सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट अशा ठिकाणी तरुणाई जल्लोष करणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने नाशिकमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते. मात्र अंनिस कडून मद्याला विरोध करून मोफत दूधाचे वाटप करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा स्मारक इथं हा अभिनव घेण्यात आला आहे. 'द म्हणजे दारूचा नव्हे तर द म्हणजे दुधाचा' हा व्यसनमुक्तीचा संदेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी "नो व्हिस्की नो बियर, हॅपी न्यु इयर" अशा घोषणाही देण्यात आल्या आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.

पुण्यात मनसेकडूनही दूधवाटप

पुण्यात मनसेकडून दारूदुकानांसमोर दुधवाटप सुरू आहे. ‘दारू नको दूध प्या’ चे आवाहन मनसेकडून नागरिकांना करण्यात येत आहे. मनसेने पुण्यातील विविध भागात दारुदुकानांसमोरच दूध वाटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Raigad Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-Monsoon Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या २४ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार; IMD अंदाज

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Rashi Bhavishya : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT