Saam Exclusive News  Saam tv
महाराष्ट्र

Saam Exclusive News : साम टीव्हीच्या बातमीचा दणका! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? कृषी विभागाचे विमा कंपन्यांना पत्र, Video

chhatrapati sambhajinagar News : साम टीव्हीच्या बातमीमुळे विमा कंपन्यांना दणका दिला आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषि विभागाने विमा कंपन्याना पत्र लिहिलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून थट्टा होत असल्याची स्थिती आठवडाभरापूर्वीच साम टीव्हीने समोर आणली होती. शेतकऱ्यांकडून क्लेम करूनही मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या विम्याची रक्कम मिळाली नसल्याचं वृत्त साम टीव्हीने समोर आणलं होतं. संभाजीनगर जिल्ह्यातील एकट्या कन्नड तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामात विमा मंजूर झालेल्या १ लाख २३ हजार ६१९ पैकी ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, ७१ हजार १०० शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे दावे काहीही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकारानंतर कृषि विभागाने विमा कंपन्यांना पत्र लिहिलं आहे.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा ६ लाखांच्या पुढे असल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकाच गावातील एकाच कुटुंबात एका भावाला विम्याची रक्कम मिळाली तर दुसऱ्या भावाला विम्याची रक्कम मिळाली नाही. शिवार एकच आहे. तर नुकसानाचे कारणदेखील सारखेच आहे. तरीही काही शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे, तर काह शेतकऱ्यांना मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना काही कारण सांगून विमा नाकारण्यात आला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एकूण १ लाख ५३ हजार ६७८ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०२३ -२४ या वर्षाच्या पीक विमाम्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३० हजार ९ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली नव्हती. त्यामुळे पिकांचा विमा काढूनही त्यांना विमा मिळालेला नाही. तर १ लाख २३ हजार ६१९ शेतकऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विमा कंपनीच्या १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदविण्यासाठी हा एकच नंबर आहे. त्यामुळे अनेकांना तक्रार नोंदविताना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी तक्रार नोंदविल्याची नोंद विमा कंपनीकडे झाली. त्यातील ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, उर्वरित ७१ हजार १०० शेतकऱ्यांचे दावे कुठलेही कारण न सांगता कंपनीमार्फत फेटाळण्यात आले आहेत. त्यानंतर कृषि विभागाने विमा कंपन्यांना पत्र लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT