36,211 COMPANIES SHUT DOWN IN MAHARASHTRA IN 5 YEARS; MUMBAI TOPS THE LIST saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 5 वर्षांत 36,000 कंपन्या बंद, केंद्र सरकारची लोकसभेत धक्कादायक माहिती

36,211 companies closed in Maharashtra in the last five years: राज्यासाठी टेंशन वाढवणारी बातमी... राज्यातल्या तब्बल 36 हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्र सरकारनंच सांगितलंय. मात्र सर्वाधिक कंपन्या कोणत्या शहरात बंद पडल्या आहेत? बंद पडलेल्या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचं काय झालं? राज्य सरकारनं याबाबत काय दावा केलाय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट........

Rohit Kadam

देशात बेरोजगारीचं संकट गडद झालेलं असतानाच महाराष्ट्रात धक्कादायक वास्तव समोर आलंय. राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम मिळत नसताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं आणखी धाकधूक वाढवलीये. कारण, राज्यातील एक, दोन नव्हे तब्बल 36 हजार कंपन्या बंद पडल्याची चिंताजनक माहिती समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या 5 वर्षांत या कंपन्यांना टाळं लागलंय. संसदेत ठाकरेसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रश्नाला सरकारनं लेखी उत्तर देताना ही माहिती दिलीये... विशेष बाब म्हणजे, या कंपन्या बंद पडल्यानं किती जण बेरोजगार झाले याची सरकारकडे आकडेवारीच नसल्याचं खासदार वाजेंनी सांगितलंय...

याचा सर्वात मोठा फटका मुंबई, ठाणे आणि पुण्याला बसलाय. कंपनी व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कुठल्या शहरात किती कंपन्या बंद पडल्यात, ते पाहूयात...

5 वर्षात 36 हजार 211 कंपन्या बंद

मुंबई - 12 हजार 9

पुणे - 6 हजार 433

ठाणे - 4 हजार 704

नागपूर - 1 हजार 478

नाशिक - 840

रायगड - 822

संभाजीनगर - 654

कोल्हापूर - 429

अहिल्यानगर - 308

सांगली - 247

सोलापूर - 262

सातारा - 196

केंद्रानं ही अधिकृत माहिती दिली असली तरी राज्याला मात्र याबाबत काहीही खबर नाही. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतच सर्वाधिक कंपन्या बंद पडल्यात. या कंपन्या नेमक्या कशामुळे बंद पडल्या, यासंदर्भात ठोस कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, यातील बहुतांश कंपन्या मॅन्युफॅक्च्युरिंग कंपन्या असल्यामुळे लाखो कामगारांचा रोजगार गेल्याची शक्यता आहे. मात्र एवढे उद्योग बंद होत असताना राज्य सरकार मात्र थंड कसं बसलं होतं? राज्यानं या उद्योगांना वाचवण्यासाठी काही पावलं उचलली का? असे गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. कारण प्रश्न रोजगाराचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Anklets Cleaning Tips: चांदीची पैंजण काळी पडली आहे? 'या' ५ घरगुती उपायांनी परत मिळवा चमक

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षक सेनेचे घंटानाद आंदोलन

OBC क्रीमी लेयरबाबत केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, जुन्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

भाजप आमदार आणि माजी मंत्र्यांचे निधन, राज्याच्या राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT