Ajit Pawar Big Statement On Population Control Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: एक किंवा दोन अपत्यावर थांबा अन्यथा..., पाणीप्रश्नाबाबत अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar Big Statement On Population Control: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून मोठं विधान केले आहे. आता एक किंवा दोन अपत्यावर थांबा अन्यथा ब्राह्मदेव जरी आला तरी पाणी पुढं पुरणं अशक्य होईल.' असे ते म्हणाले.

Priya More

'लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आपण चायनाला देखील मागे टाकले आहे.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 'आता एक किंवा दोन अपत्यावर थांबा अन्यथा ब्राह्मदेव जरी आला तरी पाणी पुढं पुरणं अशक्य होईल.' असं म्हणत अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत असून याची चर्चा होत आहे.

लोकसंख्येबाबत आणि पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केले आहे. 'अलीकडच्या काळात पाण्याचा वापर वाढला आहे. दादा कोंडकेंच्या काळात दगडाचा वापर व्हायचा. त्यानंतर टरमाळे आलं आणि आता फ्लश आले त्यामुळे दहा लिटर पाणी एकदम वाया जाते. त्यामुळे नवीन झालेल्या मुला मुलींना सांगा एक किंवा दोन आपत्य ठेवा. नाहीतर वरून ब्रह्मदेव आला तरी सर्वांना पाणी पुरणार नाही.' असं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले. अहिल्यानगरमधील जामखेड येथील जाहीर सभेमध्ये त्यांनी हे विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उदघाटनावेळी भाषणात अजित पवारांनी पाण्याचा उदभवणाऱ्या प्रश्नाला लोकसंख्या जबाबदार असल्याचे सांगितलं. अजित पवार पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत म्हणाले की, 'देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ३५ कोटी लोकसंख्या होती आणि आज १४० कोटी लोकसंख्या झाली आहे. जगात आपला कुणी हात धरत नाही. आता चायना एकावर थांबायला लागलं आहे.'

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'आम्ही सारखं अभ्यास करतोय की कुठनं पाणी आणायचं. त्याकाळात पाण्यावर वीज तयार केली जायची आता टाटाच्या धरणावर वीज तयार केली जात आहे. आता आम्ही इंडस्ट्रीजला सांगतोय गावातल्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इंडस्ट्रीजला वापरा. दादा कोंडके यांच्यावेळेस दगडावर भागायचं नंतर टरमाळेवर भागायचं आणि आता बाथरूममध्ये फ्लश केलं तरी १० लिटर पाणी जातं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT