Sanjay Raut On Ajit Pawar of pink jacket from melava Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकरण रंगलं, 'पिंक सरडा बारामती सोडणार', संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Maharashtra Politics: राज्यात रंगांचं राजकारण सुरु झालंय एकीकडे अजित पवार पिंक पॉलिटीक्स करत असतानाच ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी अजित पवारांच्या नरेटीव्हलाच सुरुंग लावलाय, शरद पवार,सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत संजय राऊत अजित पवारांना असं काय बोलले , पाहूया..

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधाकि-यांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्वाधिक लक्षवेधी भाषण ठरलं ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं. कारण संजय राऊतांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोरच अजितदादांवर जोरदार टीकेची झोड उठवलीय. अजितदादांच्या पिंक पॉलिटिक्सची खिल्ली उडवत संजय राऊतांनी थेट अजितदादांचा रंग बदलणारा सरडा असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला.

राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्रातील रंगाच्या राजकारणाचं सार सांगितलं. गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही असं म्हणत राऊतांनी अजित पवारांच्या पिंक पॉलिटीक्स नरेटीव्हलाच सुरुंग लावलाय. महाराष्ट्रात केवळ भगवा आणि तिरंगाच चालतो असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रंगाचं जॅकेट घालायला सुरुवात केलीये. हा रंग शुभ असल्याचं अजितदादांना सांगितलं गेलंय. त्यामुळेच त्यांनी या रंगाचे जॅकेट रोज घालायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही तर अजित पवार जिथं सभा घेतात तिथे गुलाबी मंडप आणि महिलाही गुलाबी फेटे घालून येतात...त्यावरच राऊतांनी प्रहार केल्यानं आता राज्यात रंगांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT