Ajit Pawar Faction Likely to Exit Mahayuti Saam TV News
महाराष्ट्र

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Tensions Rise in Mahayuti: नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट नाराज! महायुतीच्या बैठकीत डावलल्यामुळे गठबंधनातून बाहेर पडण्याचा विचार, नवा राजकीय भूकंप संभवतो.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. महायुती आणि महाआघाडीमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटला आहे.

अजित पवार गटाने नवी मुंबईत महायुतीसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रियपणे काम केलं होतं. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलले जात आहे, अशी भावना अजित पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली.

आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोनही उचलले नाहीत, असा आरोप अजित पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली.

डावल्याची भावना मनात आल्यानंतर अजित पवार गटाने नवी मुंबईत एक स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि भूमिका यावर चर्चा झाली. यावेळी नवी मुंबईत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. जर अजित पवार गट खरोखरंच महायुतीतून बाहेर पडला, तर नवी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT