Raju Shetty leads protest in Kolhapur against Mahadevi Elephant’s transfer to Gujarat; warns government of electoral consequences.  x
महाराष्ट्र

Mahadevi Elephant: महादेवी अडवणार महायुतीचा BMC कडे जाणारा रस्ता? नंदिनी हत्तीणीवरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

Mahadevi Elephant Controversy : येत्या बीएमसी निवडणुकीत महादेवी हत्तीच्या मुद्द्यामुळे सत्ताधारी महायुती आघाडीला महागात पडू शकते, असा इशारा राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

Bharat Jadhav

  • महादेवी हत्तीणीच्या हस्तांतरावरून कोल्हापुरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळतो आहे.

  • महादेवीला अंबानींच्या वनतारा प्रकल्पात पाठवल्याने संतप्त नागरिकांनी जिओ सिम पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विरोधात मोठं आंदोलन केलं आणि सरकारला थेट इशारा दिला.

  • हे प्रकरण बीएमसी निवडणुकीत महायुतीसाठी राजकीय अडथळा ठरू शकतं.

कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीवरून राजकारण तापलंय. महादेवी हत्तीणीला परत असण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. इतकेच नाहीतर त्यांनी थेट सरकारला महापालिकेच्या निवडणुकीत दणका देण्याचा इशारा दिला. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात रवानगी करण्यात आली.

वनतारा हे अंबानींच्या मालकीचं असल्यानं त्यावरून कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केलाय. अंबानींच्या वनतारामध्ये महादेवी नेल्यामुळे कोल्हापूरमधील ७०० गावांमधील ग्रामस्थांनी जिओ सिम पोर्ट केलंय. आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्चा काढण्यात आला. या पदयात्रेत अनेकांनी सहभाग घेतला होता. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला गंभीर इशारा दिलाय.

जर महादेवी हत्तीणी परत आणलं नाही तर मुंबई महापालिकेत दणका देऊ,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. जर तुम्ही हस्तक्षेप करून अंबानींना आदेश देऊन आमची हत्तीणी परत दिला नाही तर तुम्हाला इशारा देतो, तुमच्यासाठी महत्त्वाची असणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीत तुमच्या उरावर बसू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. यावेळी त्यांनी अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पावर गंभीर आरोप केले.

माधुरी हत्तीणीबाबत खोटा रिपोर्ट करण्यात आला. हत्तीणीला मठाकडे सुपूर्त करा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलीय. आता या हत्तीणीच्या प्रेमापोटी ग्रामस्थांनी थेट राष्ट्रपतींकडं दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सह्य्यांची मोहिमही सुरू केली. महादेवी हत्तीणीबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी राजू शेट्टी यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवदेन दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

SCROLL FOR NEXT