Mahadev Munde Case Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : गळा कापला, अंगावर १६ वार; महादेव मुंडेंचा अंगावर काटा आणणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Beed News : परळी (बीड) येथील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Alisha Khedekar

बीडच्या परळी मधील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही हत्या होऊन २० महिने उलटूनही अद्याप या प्रकरणी कोणत्याही मारेकऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र आता महादेव मुंडे यांच्या नऊ पानांच्या शवविच्छेदन अहवालातून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. मुंडे यांचा आधी गळा कापला तसेच मानेवर आणि हातावर १६ वार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून माहिती मिळाली आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडेंची २१ ऑक्टोबर रोजी भर दिवसा चौकामध्ये निर्घृन हत्या करण्यात आली. महादेव मुंडे यांचा अगोदर गळा कापला तब्बल वीस सेंटीमीटर पर्यंत लांब आठ सेमी रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले महादेव मुंडे यांच्या अंगावर तब्बल १६ वार आहेत. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मुंडेंची हत्या झाल्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर गंभीर वार झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेले पांढरी बनियन, ब्राऊन कलरचा शर्ट, लाल करदोरा आणि पाकीट होते. चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखली होती.

मात्र वीस महिन्यानंतरही यातील आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल समोर आला असून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT